Lokmat Sakhi >Food > Ganesh Chaturthi 2025 : पूजेसाठी परफेक्ट तीर्थ करण्याची पाहा पारंपरिक कृती, ‘असे’ असावे योग्य प्रमाण

Ganesh Chaturthi 2025 : पूजेसाठी परफेक्ट तीर्थ करण्याची पाहा पारंपरिक कृती, ‘असे’ असावे योग्य प्रमाण

Ganesh Chaturthi 2025: See the traditional recipe for making the perfect Tirtha, the right proportion should be ‘like this’ : तीर्थ करताना लक्षात ठेवा या टिप्स. एकदम मस्त आणि चविष्ट तीर्थ होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 15:03 IST2025-08-26T14:34:45+5:302025-08-26T15:03:47+5:30

Ganesh Chaturthi 2025: See the traditional recipe for making the perfect Tirtha, the right proportion should be ‘like this’ : तीर्थ करताना लक्षात ठेवा या टिप्स. एकदम मस्त आणि चविष्ट तीर्थ होईल.

Ganesh Chaturthi 2025: See the traditional recipe for making the perfect Tirtha, the right proportion should be ‘like this’ | Ganesh Chaturthi 2025 : पूजेसाठी परफेक्ट तीर्थ करण्याची पाहा पारंपरिक कृती, ‘असे’ असावे योग्य प्रमाण

Ganesh Chaturthi 2025 : पूजेसाठी परफेक्ट तीर्थ करण्याची पाहा पारंपरिक कृती, ‘असे’ असावे योग्य प्रमाण

तिर्थप्रसाद हा आपल्या उत्सवांमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. देवपूजेनंतर भक्तांना वाटले जाणारे हे पेय अगदी चमचाभर प्यायले तरी प्रसन्न वाटते. त्याची चव फार छान असते. (Ganesh Chaturthi 2025: See the traditional recipe for making the perfect Tirtha, the right proportion should be ‘like this’)तीर्थ तयार करताना त्यात काय पदार्थ घालायचे आणि त्यांचे प्रमाण लक्षात घेतले तर तुम्हीही एकदम मस्त तीर्थ घरी करु शकता. पाण्याचा तसेच दुधाचा वापर करुन तीर्थ करता येते.

काही घरी पाण्याचे  तीर्थ केले जाते. ते करताना  पाणी स्वच्छ उकळलेले किंवा फिल्टर केलेले वापरणे योग्य ठरते. एखाद्या चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात एक ते दीड लिटर स्वच्छ पाणी घ्यायचे. त्यात दोन-तीन चमचे साखर घालायची. साखर विरघळू द्यायची. पाणी ढवळायचे. काही ठिकाणी साखरेऐवजी गुळाचा वापरही केला जातो. त्यानंतर त्यात एक-दोन वेलदोडे थोडेसे ठेचून घालावेत, ज्यामुळे ति‍र्थाला गोडसर चव आणि सुगंध येतो. हवे असल्यास काही केशर किंवा थोडं गुलाबपाणी टाकले तरी सुगंध वाढतो. चवही छान येते. त्यात तुळशीची पाने घाला आणि मग ते आरती नंतर वाटा. आरती सुरु होण्याच्या किमान तासभर आधीच तयार करा म्हणजे छान मुरते.

दुसरी पद्धत म्हणजे गायीचे दूध वापरुन तीर्थ तयार करायचे. त्यात थोडे तूपही घालण्याची पद्धत आहे. चवीलाही छान लागते. तसेच तुपामुळे पौष्टिक वाढते. मात्र घरचे साजूक तूप वापरा. विकतच्या तुपाला चव वेगळीच लागेल. त्यामुळे छान घरचेच तूप घ्यायचे. जर तांब्याभर तीर्थ करायचं असेल तर त्यात अर्ध्याहून जास्त दूध घ्या. थोडे पाणी त्यात मिसळा. तसेच साखर घाला आणि त्यात तुळशीची पाने घाला. ढवळा आणि त्यात थोडी वेलची पूड घाला. एकदम मस्त लागले. तासभर तरी मुरायला हवे म्हणजे चव छान लागते. काही जण त्यात अगदी थोडे गोमूत्रही घालतात. मात्र सगळ्यांनाच ते पचते असे नाही. त्यात थोडी सुकामेव्याची पूडही घालू शकता. तीर्थ अगदी चमचाभर जरी प्यायचे असले तरी त्याची चव छान असेल तर आरतीनंतर आणखी प्रसन्न वाटते. त्यामुळे तीर्थ करताना मस्तच करा. 

Web Title: Ganesh Chaturthi 2025: See the traditional recipe for making the perfect Tirtha, the right proportion should be ‘like this’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.