लवकरच घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे.(Festival recipe) गणेशोत्सवाच्या काळात आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे पदार्थ केले जातात.(modak recipe) या दिवशी घरात पाहुण्यासह खाद्यपदार्थांची देखील रेलचेल पाहायला मिळते.(Kids favorite modak recipe) या १० दिवसांत आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बाप्पासाठी करतो. पण आपल्याला तळणीचे, उकडीचे मोदर करताना वैताग येतो.(Biscuit modak recipe) कधी ते फसतात किंवा तेलात जाऊन फुटतात. पण यंदा बाप्पासाठी काही खास करायचे असेल तर बिस्किटांपासून आपण मोदक बनवू शकतो.(Ganpati special sweets) लहान मुलांना चॉकलेटचे बिस्किट जास्त प्रमाणात आवडते. मोदक करताना मुलांचा हट्ट असतो की, काही तरी वेगळं करायला हवं.(Ganesh Chaturthi 2025 recipes) जर तुमची मुलांना देखील बिस्किट अधिक आवडत असतील तर ओरिओ चॉकलेट बिस्किटांपासून करा १० मिनिटांत होणारा मोदक.
बेसनाचा पोळा तव्याला चिकटतो? पाहा १ चमचा मिठाचा सोपा उपाय-पोळ्याला पडेल छान जाळी
साहित्य
ओरिओ बिस्किट पॅकेट - १ पुडादूध - आवश्यकतेनुसार काजू पावडर तूप - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी ओरिओ बिस्किटचे पॅकेट फोडून घ्या. त्यातील बिस्कीट वेगळे करुन त्यात असणारे क्रीम एका वाटीत काढून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात ओरिओ बिस्किटचा पावडर करा. तयार पावडरमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात दूध घालून त्याचे पीठ मळून घ्या.
2. आता ताटात बिस्कीटांची क्रीम आणि काजू पावडर घालून चांगला गोळा तयार करा. आता मोदकाच्या साच्याला आतून थोडे तूप लावून घ्या. तयार बिस्किटांचे आवरण व्यवस्थित साच्यात बसवून त्यात क्रीमचे मिश्रण भरा. सारण व्यवस्थित भरुन पुन्हा पिठाने बंद करा. तयार होतील अवघ्या १० मिनिटांत होणारे मुलांना आवडणारे ओरिओ चॉकलेटचे मोदक.