उन्हाळा म्हटलं की आपल्याला वारंवार थंडगार पदार्थ खाण्या-पिण्याची इच्छा होतेच. उन्हाळ्यात थंडगार पदार्थ खाऊन आपण स्वतःला शांत करु शकतो. उन्हाळ्यात अनेकदा गाड्यावर रंगीबेरंगी बर्फाचा (Frozen Watermelon Dessert) गोळा विकायला घेऊन येतात. हा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा आपल्याला खावासा वाटतो. उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या अंगाने असा हा रंगीबेरंगी बर्फाचा गोळा खाण्याची मज्जा आपण बालपणात सगळ्यांनीच घेतली असेल. परंतु गाड्यावर (Sweet & Spicy Frozen Watermelon) विकत मिळणारा हा बर्फाचा गोळा दिसायला जितका छान, रंगीबेरंगी असतो तितकाच (Watermelon Recipe) तो आपल्या आरोग्याला हानिकारक देखील असतो. या बर्फाच्या गोळ्यातील रंग हे केमिकल्सयुक्त पदार्थ वापरुन तयार केलेले असतात. तसेच ते दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि चव येण्यासाठी त्यात भरपूर साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह मिसळलेले असतात.
यासाठीच असा हा बर्फाच्या गोळा खाण्यापेक्षा आपण घरच्या घरीच कलिंगडाचा गोळा तयार करून खाऊ शकतो. उन्हाळयात लालचुटुक रंगाची रसरशीत, रसाळ कलिंगड विकत मिळतात. तसेच घरगुती पदार्थ आणि कलिंगडासारख्या फळाचा वापर केल्याने ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरु शकते. सध्या इंटरनेटवर या कलिंगडापासून तयार होणाऱ्या गोळ्याची रेसिपी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यासाठी घरच्या घरीच कलिंगडाचा गोळा कसा तयार करायचा त्याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. कलिंगड - १ (मध्यम आकाराचे काप करून घ्यावेत)
२. मध - १ टेबलस्पून
३. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
४. चाट मसाला - चिमूटभर (पर्यायी)
फक्त १० मिनिटांत मिक्सरमध्येच फिरवा ढोकळ्याचं पीठ, ढोकळा होईल कापसाहून हलका-जाळीदार परफेक्ट...
फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यांत आधी कलिंगड कापून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे तुकडे करून घ्यावेत.
२. आता हे तुकडे एका डिशमध्ये ठेवून ५ ते ६ तासांसाठी डीप फ्रिजरमध्ये ठेवून द्यावेत.
३. ५ ते ६ तासानंतर हे कलिंगडाचे काप गोठून बर्फाप्रमाणेच कडक झालेले असतील.
फक्त १० मिनिटांत करा कैरी - पापड चाट! आंबटगोड इंन्स्टंट रेसिपी-उन्हाळ्यासाठी खास पदार्थ...
४. आता हे कडक झालेले कलिंगडाचे काप किसणीवर किसून बर्फाच्या गोळ्याप्रमाणेच त्याचा किस पाडून घ्यावा.
५. हा किस एका वाटीत घेऊन त्यावर चमचाभर मध पसरवून घालावे. मग त्यावर चमचाभर लिंबाचा रस ओतावा.
६. जर आपल्याला चाट मसाला आवडत असेल तर आपण चाट मसाला देखील भुरभुरवून घालू शकता.
मस्त थंडगार आंबट - गोड चवीचा कलिंगडाचा गोळा खाण्यासाठी तयार आहे.