lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Foods To Be Avoided Before Sleeping : रात्री झोपण्यापूर्वी अजिबात खाऊ नका 4 पदार्थ, तज्ज्ञ सांगतात तब्येत बिघडण्याचं कारण

Foods To Be Avoided Before Sleeping : रात्री झोपण्यापूर्वी अजिबात खाऊ नका 4 पदार्थ, तज्ज्ञ सांगतात तब्येत बिघडण्याचं कारण

Foods To Be Avoided Before Sleeping : रात्री झोपताना कोणत्या गोष्टी टाळल्या तर तब्येत चांगली राहण्यास मदत होईल याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 12:42 PM2022-05-05T12:42:08+5:302022-05-05T12:57:52+5:30

Foods To Be Avoided Before Sleeping : रात्री झोपताना कोणत्या गोष्टी टाळल्या तर तब्येत चांगली राहण्यास मदत होईल याविषयी...

Foods To Be Avoided Before Sleeping: Don't Eat 4 Foods Before Going To Bed At Night, Experts Say Causes | Foods To Be Avoided Before Sleeping : रात्री झोपण्यापूर्वी अजिबात खाऊ नका 4 पदार्थ, तज्ज्ञ सांगतात तब्येत बिघडण्याचं कारण

Foods To Be Avoided Before Sleeping : रात्री झोपण्यापूर्वी अजिबात खाऊ नका 4 पदार्थ, तज्ज्ञ सांगतात तब्येत बिघडण्याचं कारण

Highlightsगोड पदार्थ, आंबट पदार्थ, धान्ये, डेअरी उत्पादने, बेकरीची उत्पादने शक्यतो टाळायला हवीत. रात्री पोषण देणारा आणि हलका आहार घेतल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. रात्री पचनक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे आहारात हलके पदार्थ घेतलेले तब्येतीसाठी केव्हाही चांगले.

आपले आरोग्य हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असते. उत्तम आहार-विहार, पुरेशी झोप, व्यायाम हे सगळे व्यवस्थित असेल तर आपण दिर्घकाळ ठणठणीत राहू शकतो. पण आहार-विहार आणि इतर बाबींमध्ये शिस्त नसेल तर मात्र आपल्याला सतत तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. रात्री झोपताना हलका आहार घ्यावा, तसेच रात्रीचे जेवण लवकर करावे म्हणजे खाल्लेले अन्न पचते हे सगळे आपण नेहमी ऐकतो. मात्र काही जण रात्री उशीरा आणि चुकीचे अन्नपदार्थ खातात. (Foods To Be Avoided Before Sleeping) त्यामुळे अॅसिडीटी, अपचन, गॅसेस किंवा लठ्ठपणा आणि इतरही अनेक तक्रारी उद्भवतात. रात्री झोपताना कोणत्या गोष्टी टाळल्या तर आपली तब्येत चांगली राहील याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. मसालेदार पदार्थ 

भारतीय जेवणात मसाले वापरण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच जास्त असते. आपण भाजी, बिर्याणी, आमटी तिंवा इतरही पदार्थांमध्ये सर्रास भरपूर मसाले वापरतो. पण तुम्हाला असे मसालेदार पदार्थ खायला आवडत असेल तर ते सकाळी किंवा दुपारी खायला हवे. रात्रीच्या वेळी मसालेदार पदार्थ खाल्ल्यास त्याचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. त्यामुळे छातीत जळजळ होणे, डोके जड होणे, अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे रात्री झोपताना मसालेदार पदार्थ टाळलेले तब्येतीसाठी केव्हाही चांगले. 

२. तळलेले पदार्थ

तेलात तळलेले पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडते. हे पदार्थ तळलेले असल्याने चटपटीतही लागतात. मात्र रात्रीच्या वेळी हे पदार्थ खाल्ले तर पचनाच्या तक्रारी उद्भवतात. तसेच रात्री तळकट खाल्ल्याने पाणी पाणी होते. झोपताना कमीत कमी पाणी प्यायचे असते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी किडनीवर ताण येणार नाही. तसेच तळलेल्या पदार्थांतून शरीराचे पोषण होतेच असे नाही. त्यामुळे तळलेले पदार्थ रात्रीच्या वेळी न खाल्लेलेच बरे.

३. अल्कोहोल

हल्ली अल्कोहोल घेणे हे अतिशय सामान्य झाले आहे. वयाच्या २० व्या वर्षापासून वयस्कर लोकांपर्यंत अल्कोहोल घेण्याचे प्रमाण वाढले आहेत. बदलती जीवनशैली, वाढते ताण आणि स्टेटस सिम्बॉल या कारणांमुळे कुटुंबात तसेच मित्रमंडळींसोबत अल्कोहोल घेतले जाते. मात्र आरोग्यासाठी अल्कोहोलचे सेवन अजिबात चांगले नसून त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. अॅसिडीक पदार्थ 

रात्रीच्या वेळी आपण जेवल्यानंतर फारशी हालचाल न करता लगेच झोपतो. त्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होतेच असे नाही. म्हणून रात्री अॅसिडीक पदार्थ शक्यतो टाळावेत. यामध्ये गोड पदार्थ, आंबट पदार्थ, धान्ये, डेअरी उत्पादने, बेकरीची उत्पादने शक्यतो टाळायला हवीत. रात्री पोषण देणारा आणि हलका आहार घेतल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते. 

Web Title: Foods To Be Avoided Before Sleeping: Don't Eat 4 Foods Before Going To Bed At Night, Experts Say Causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.