Join us

Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 14:00 IST

Food Recipe: सध्या भाज्या महाग असल्यामुळे कडधान्यावर तरी किती वेळ भागवणार? तेव्हा असेच चटपटीत पदार्थ येतात कामी, करून बघा ही दही तिखारी!

भाजी, पोळी, आमटी, भात हे जेवणाचे मुख्य घटक असले तरी तोंडी लावण्याचे पदार्थ अर्थात ताटाची डावी बाजूही तेवढीच महत्त्वाची असते. चटणी, कोशिंबीर, लोणचं, मुरंबा, पंचामृत, कुरडई, पापड इ. मात्र जेव्हा मुख्य घटकांचा तुटवडा होतो तेव्हा हे तोंडी लावण्याचे पदार्थ लीड रोल घेतात आणि पोटभरीला कामी येतात. अशातच एक पदार्थ आहे काठियावाडी दही तिखारी!

हा पदार्थ तुम्ही भाजीला, आमटीला पर्याय म्हणून करू शकता किंवा जेवणाची लज्जत वाढावी म्हणूनही करू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी रेसेपी!

दही तिखारी करण्यासाठी कालावधी : १० मिनिटे 

साहित्य : फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, मिरची, कांदा, लसूण, तिखट पावडर, कोथिंबीर, दही

कृती : 

>> सर्वप्रथम गॅसवर एका छोट्या पॅन मध्ये दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घाला. 

>> त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा फोडणीत परतून घ्या. 

>> कांदा छान परतला जाईपर्यंत खलबत्त्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि तिखट पावडर कुटून घ्या. 

>> कुटून झालेले वाटण कांद्याबरोबर परतून घ्या. 

>> लसणाचा आणि तिखटाचा कच्चेपणा गेला की गॅस बंद करा. 

>> मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात वाटीभर दही, मीठ आणि कोथिंबीर घाला. दही तिखारी खाण्यासाठी तयार. 

पहा प्रत्यक्ष व्हिडीओ - 

टॅग्स :अन्नपाककृती