Join us  

कढी फुटू नये, पांचट होवू नये म्हणून खास टीप, विष्णू मनोहर सांगतात स्पेशल दही कढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 12:56 PM

कढी करताना ताक (butter milk)किती घ्यायचं आणि पीठ (besan) किती घ्यायचं, याचं सारखं कनफ्यूजन होतं. कधी कढी होते बेचव आणि पांचट होते तर कधी कढीमध्ये पिठाचे गोळे होतात... हे सगळं टाळण्यासाठीच तर ही रेसिपी बघा (How to make Kadhi from curd) आणि थंडी स्पेशल (winter special) गरमागरम कढी बनवा 

ठळक मुद्देकढी पिण्याचा आनंद आणि तिच्यातल्या पौष्टिक गुणांचा लाभ आपल्या शरीराला होण्यासाठी कढीतल्या सगळ्या पदार्थांचं प्रमाण अचूक जमलं पाहिजे.

थंडी (winter) म्हणजे जणू काही सर्दी (cold), खोकला, कफ (cough)अशा आजारांचा सिझन... घरोघरी अशा आजारांनी त्रस्त असणारी एखादी व्यक्ती तरी असतेच. बरं हे आजार असे आहेत की घरातल्या एका जणाला झाला की हळूहळू घरातल्य सगळ्या जणांना त्याचा संसर्ग होत जातो. मग एकामागे एक सगळेच सर्दी- खोकला- कफ होऊन परेशान होतात. हा त्रास कमी करण्यासाठी आपण औषधी घेतो. पण या आजारांवर कढी (beneficial for cold and cough) हा देखील एक चांगला, घरगुती आणि अतिशय परिणामकारक उपाय (home remedy)आहे. 

 

शिवाय थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी खिचडी केली की त्यासोबत गरमागरम चवदार कढी प्यायलाही खूपच मजा येते. कढी- खिचडी हा अनेक लोकांचा आवडीचा मेन्यू... एखाद्या दिवशी कधी पराठे केले तरी त्यासोबत कढी चालून जाते. एवढंच काय कोणताही स्वयंपाक केला तरी त्यासोबत कढीची वाटी अलगद फस्त केलीच जाते. अशी ही कढी खूपच बहुगुणी आहे. फक्त कढी पिण्याचा आनंद आणि तिच्यातल्या पौष्टिक गुणांचा लाभ आपल्या शरीराला होण्यासाठी कढीतल्या सगळ्या पदार्थांचं प्रमाण अचूक जमलं पाहिजे. म्हणूनच तर ही घ्या प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर (Vishnu Manohar recipe) यांनी सांगितलेली कढी करण्याची ही एक झकास, चटपटीत रेसिपी.

कढी करण्यासाठी लागणारं साहित्यIngredients for making kadhiदोन वाट्या घोटलेलं दही, दोन चमचे बेसन पीठ, तूप, हिरव्या मिरच्या, हिंग, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, जीरे आणि मोहरी, चवीनुसार मीठ आणि साखर

 

कशी करायची कढी?Recipe: How to make Kadhi- कढी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी दही (curd)आणि बेसन पीठ एका बाऊलमध्ये एकत्र करून घ्या आणि चांगले फेटून घ्या. असं केल्यामुळे कढीत बेसन पीठ चांगले मिसळले जाते आणि कढीमध्ये पीठाचे गोळे होत नाहीत.- आता त्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे पाणी टाका.- कढईमध्ये तूप घाला. तुप गरम झाले की जिरे- मोहरी टाकून फोडणी करा. - फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या, हिंग, कढीपत्ता, अद्रक असं सगळं टाका.- यानंतर यात दही आणि पीठाचं आपण केलेलं पाणी टाका.- आता कढीमध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाका.- कढीला उकळी येताच गॅस बंद करा आणि गरमागरम कढीचा आस्वाद घ्या...

 

अशीही करता येते थंडी स्पेशल कढी- कढी करण्याची दुसरी पद्धत म्हणजे दही, बेसन पीठ एका पातेल्यामध्ये एकत्र करायचं. यात हवं तेवढं पाणी टाकायचं. त्यातच मीठ, साखर, किसलेलं अद्रक टाकायचं. हे मिश्रण उकळत आलं की त्याला वरून फोडणी घालायची.- कढीमध्ये बारीक चिरलेला लसूण टाकल्यानेही कढी अधिक चवदार होते.- याशिवाय कढीमध्ये फोडणी घालताना त्यात थोड्या लवंगाही टाका आणि कढीमध्ये थोडी दालचिनीची पावडरही टाका. कढी अधिक चवदार होईल आणि सर्दी, खोकला, कफ या आजारांमध्ये अधिक गुणकारी ठरेल. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.विष्णु मनोहर