lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > हिरवी मिरची आणि लसणाचं मस्त झणझणीत लोणचं! रेसिपी अशी की तोंडाला पाणी सुटेल 

हिरवी मिरची आणि लसणाचं मस्त झणझणीत लोणचं! रेसिपी अशी की तोंडाला पाणी सुटेल 

How to make green chili, garlic pickle: कैरी, लिंबू, आवळा अशी लोणची खाऊन कंटाळा आला, की हे मस्त झणझणीत लोणचं करा... (green chili, garlic pickle) लोणच्याची इन्स्टंट रेसिपी (instant recipe)... एकदा करा आणि चव चाखून बघाच.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 07:19 PM2021-12-03T19:19:48+5:302021-12-03T19:20:49+5:30

How to make green chili, garlic pickle: कैरी, लिंबू, आवळा अशी लोणची खाऊन कंटाळा आला, की हे मस्त झणझणीत लोणचं करा... (green chili, garlic pickle) लोणच्याची इन्स्टंट रेसिपी (instant recipe)... एकदा करा आणि चव चाखून बघाच.. 

Food, Recipe: How to make green chilli, garlic pickle, spicy, delicious recipe | हिरवी मिरची आणि लसणाचं मस्त झणझणीत लोणचं! रेसिपी अशी की तोंडाला पाणी सुटेल 

हिरवी मिरची आणि लसणाचं मस्त झणझणीत लोणचं! रेसिपी अशी की तोंडाला पाणी सुटेल 

Highlightsकच्चा लसूण आणि आले मोठ्या प्रमाणात या लोणच्यात वापरले गेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ खाण्याचा फायदा या लोणच्यातून मिळेल.

लिंबू मिरचीचं लोणचं उपवासाचं आणि नेहमीचं असं तुम्ही ऐकलं असेल. पण हे जे हिरवी मिरची, लसूण आणि आलं घालून केलेलं लोणचं आहे, ते एकदम वेगळं आणि झणझणीत आहे. कच्चा लसूण आणि आले मोठ्या प्रमाणात या लोणच्यात वापरले गेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ खाण्याचा फायदा या लोणच्यातून मिळेल. शिवाय चवीतही बदल होईल. लोणचं करायला अतिशय सोपं आहे. ( How to make green chili, garlic pickle) बघा ही मस्त झणकेदार रेसिपी (recipe). ही रेसिपी cookwithparool या इन्स्टाग्राम (instagram) पेजवर शेअर झाली आहे. 

 

लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य
Ingredients for making green chilli, garlic pickle

हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळया १५० ग्रॅम, आलं १०० ग्रॅम, चवीपुरतं मीठ, दोन टेबलस्पून तिखट, १ टीस्पून कलौंजी, ४ टेबलस्पून व्हिनेगर किंवा अर्धा कप लिंबाचा रस, २ टेबलस्पून धने, दोन टेबलस्पून बडिशेप, १ टीस्पून मेथी दाणे, १ टीस्पून पिवळे मेथी दाणे, ७ टेबलस्पून मोहरीचं तेल, १ टीस्पून हळद, १ टीस्पून ओवा. 

कसं करायचं लोणचं?
How to make green chilli, garlic pickle

- हे लोणचं करण्यासाठी सगळ्यात आधी हिरवी मिरची धुवून घ्या आणि स्वच्छ कोरडी करून तिची देठं काढून टाका.
- यानंतर आले धुवून त्याचं साल काढून टाका. लसून सोलून घ्या.


- जेवढ्या मिरच्या, लसूण, आलं आहे, त्याचे प्रत्येकाचे अर्धे अर्धे सम प्रमाणात दोन हिस्से करा.
- आता एक हिस्सा तसाच राहू द्या आणि एक हिस्सा मिक्सरमधून फिरवून जाडसर वाटून घ्या.
- मिरची, लसूण, आलं यांचा उरलेला जो हिस्सा आहे, त्याचे सगळ्याचे एकसारखे तुकडे करून घ्या.
- हे तुकडे आणि मिक्सरमधून वाटलेला हिस्सा एकत्र करा. त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, तिखट टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि १ ते २ तासांसाठी त्याच्यावर झाकण ठेवून ते सेट होऊ द्या.
- तोपर्यंत लोणच्याचा मसाला तयार करा.

 

- मसाला तयार करण्यासाठी मेथी, मोहरी, बडिशेप, धने हे सगळं साहित्य तव्यावर भाजा. कोमट झालं की मिक्सरमध्ये फिरवून जाडसर वाटून घ्या.
- त्यानंतर तेल गरम करून घ्या.
- आता मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आणि मीठ आपण घातलेल्या लोणच्यात टाका.वरून तेल टाका.
- सगळं लोणचं व्यवस्थित हलवून घ्या आणि घट्ट झाकण असलेल्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. 

 

Web Title: Food, Recipe: How to make green chilli, garlic pickle, spicy, delicious recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.