Join us  

झणझणीत, कुरकुरीत मस्त करारी भरली भेंडी ! ही घ्या झणकेदार रेसिपी, चव अशी की भूक खवळेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 8:40 PM

एरवी भेंडीची भाजी पाहून नाक मुरडत असाल, तर थोडं थांबा.. ही भरल्या भेंडीची मस्त रेसिपी बघा.... अशी झणकेदार रेसिपी की नुसत्या सुवासानेच भुक खवळेल..

ठळक मुद्देभेंडीची भाजी कशाला केली, असं म्हणत तोंड वाकडं करणारी सगळीच मंडळी ही भरली भेंडी मात्र मोठ्या आवडीने खातील, हे निश्चित.

बऱ्याच लहान मुलांना भेंडीची भाजी आवडते. मग अगदी रोज डब्यात भेंडी दिली तरी ते खुश असतात. पण तेवढ्याच प्रेमाने आणि आवडीने भेंडी खाणारी मोठी माणसं मात्र क्वचितच सापडतात. म्हणूनच तर नेहमीसारखी भेंडीच्या बारीक बारीक चकत्या करून नुसती फोडणी घालून भेंडीची भाजी बनवणं बाजूला ठेवा आणि एकदा अशी मस्त झणकेदार भरली भेंडी करून पहा. भेंडीची भाजी कशाला केली, असं म्हणत तोंड वाकडं करणारी सगळीच मंडळी ही भरली भेंडी मात्र मोठ्या आवडीने खातील, हे निश्चित. 

 

अशी करा भरली भेंडी...- भरल्या भेंडीची भाजी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकी आपण ही सोपी पद्धत बघूया आणि अशा पद्धतीने मस्त झणकेदार भेंडीची भाजी बनवूया.- भेंडीची भाजी बनविण्यासाठी सगळ्यात आधी भेंड्या स्वच्छ धुवून घ्या. त्यांची मागची आणि पुढची टोके काढून टाका आणि भेंड्या बरोबर मध्यभागी उभ्या चिरून घ्या. पुर्णपणे चिरू नका. फक्त सारण भरण्यासाठी थोडा गॅप तयार करा.- यानंतर एका कढईत ३ टेबलस्पून बेसन पीठ, १ टेबलस्पून भाजलेल्या शेंगादाण्याचा कुट, २ टेबलस्पून किसलेलं खोबरं, २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, १ टेबलस्पून आमचूर पावडर, जीरे पूड, धने पूड, लाल तिखट, गरम मसाला, चुटकीभर हळद, थोडंसं हिंग, १ टीस्पून साखर असं सगळं टाका आणि थोडंसं भाजून घ्या. - थोडंसं भाजून घेतल्यानंतर त्यात दोन टी स्पून तेल, चवीनुसार मीठ टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- हा मसाला आपल्याला खूप जास्त भाजायचा नाही, हे लक्षात ठेवा.

 

- मसाला थोडा थंड झाला की तो भेंडीला जिथे काप दिला आहे, त्यामध्ये व्यवस्थित भरून घ्या.- यानंतर आता पुन्हा दुसरी कढई तापायला ठेवा. त्यामध्ये २ ते ३ टीस्पून तेल टाका. तेल गरम झालं की १ टीस्पून जीरे, चुटकीभर हिंग आणि चवीनुसार तिखट टाका. या तेलात आता मसाला भरलेल्या भेंड्या अलगद सोडा. कढई उचलून अलगदपणे भेंड्या टॉस करून घ्या.- यानंतर यात चवीनुसार मीठ टाका. वरतून थोडीशी चिरलेली कोथिंबीर भुरभुरा.- कढईवर झाकण ठेवा आणि ७ ते ८ मिनिटे चांगली वाफ येऊ द्या. त्यानंतर थाेडंसं पाणी टाका आणि पुन्हा एकदा चांगली वाफ येऊ द्या.- भेंडी शिजली की गॅस बंद करा. वरतून पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर टाका आणि कढईवर झाकण ठेवून भाजी सेट होऊ द्या.- त्यानंतर गरमागरम भरली भेंडी सर्व्ह करा... 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.