Join us  

फ्लॉवरचं भरीत खाल्लं आहे कधी? फ्लॉवर भाजून भरीत, करून पाहा भन्नाट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 1:02 PM

How to make cauliflower bhareet: वांग्याचं भरीत माहिती आहे, पण फ्लॉवरचं भरीतही भलतंच चवदार होतं.. करून बघा.. ताटात फ्लॉवर बघून नाक मुरडणाऱ्या मुलांसाठी तर बेस्ट रेसिपी आहे ही...

ठळक मुद्देफ्लॉवर न आवडणाऱ्या मुलांना फ्लॉवर खाऊ घालायचं असेल, तर फ्लाॅवरचं भरीत हा एक बेस्ट पर्याय आहे... 

फ्लॉवरची भाजी सुकी असो किंवा मग रस्सा... करण्याची पद्धत आणि भाजीसाठी वापरण्यात आलेलं साहित्य जवळपास सारखंच असतं.. काही जणांना फ्लॉवर अजिबात आवडत नाही. त्यामुळे इतर कोणत्या भाजीत जरी फ्लॉवर (delicious recipe of cauliflower) दिसलं तरी ते अलगदपणे बाजूला काढलं जातं. म्हणूनच अशा सर्वांसाठी फ्लॉवरचं भरीत हा एक उत्तम पर्याय आहे. मुळात हे भरीत खूप वेगळ्या पद्धतीने बनविण्यात येत असल्याने आपण फ्लॉवर पासून बनविलेला एखादा पदार्थ खात आहोत, हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे फ्लॉवर न आवडणाऱ्या मुलांना फ्लॉवरची भाजी खाऊ घालायची असेल, तर फ्लाॅवरचं भरीत हा एक बेस्ट पर्याय आहे... 

 

ही रेसिपी Amma Ki Thaali या इन्स्टाग्राम (instagram) पेजवर शेअर करण्यात आली असून नेटकरींना ही रेसिपी भलतीच आवडती आहे. आजपर्यंत आम्ही फ्लॉवरच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या. पण अशी रेसिपी आम्ही पहिल्यांदाच पाहिली असून ही रेसिपी ट्राय करण्यासाठी खूपच उत्सूक आहोत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. काही जणांनी ही रेसिपी करून बघितली असून फ्लॉवरचं भरीत खूपच उत्कृष्ट झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे चला तर मग खूप उशीर न करता झटपट या रेसिपीच्या तयारीला लागू या.

 

कसं करायचं फ्लॉवरचं भरीत ?How to make cauliflower's bharta/ bharit or sabji?१. सगळ्यात आधी तर फ्लॉवरची सगळी पानं काढून टाका. गॅसवर पातेलंभर पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झालं की त्यात फ्लॉवरचा गड्डा टाका. फ्लॉवर चिरू नका. तसाच अख्खा पाण्यात टाका.२. गरम पाण्यात दोन- तीन मिनिट राहू दिल्यानंतर फ्लॉवर पाण्यातून बाहेर काढा. त्यातलं पाणी निथळून जाऊ द्या. त्यानंतर त्यावर थोडा तेलाचा हात फिरवा आणि मग तो गॅसवर तसाच टाकून भाजून घ्या. भरीत करण्यासाठी वांगी भाजतो, तसाच हा फ्लॉवर भाजून घ्या.३. भाजलेला फ्लॉवर थंड झाला की तो किसून घ्या. यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटोही किसून घ्या आणि त्याची प्युरी करा.

४. कढई गॅसवर तापायला ठेवा. त्यात तेल टाका. तेल तापल्यानंतर जीरे, लाल मिरच्या, लसूण, कढीपत्ता, तेजपान टाकून फोडणी करून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाका. कांदा चांगला परतून झाला की त्यात टोमॅटोची प्युरी टाका. ५. टोमॅटो प्युरी चांगली परतली आणि तिला तेल सुटू लागलं की त्यात गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि धने पावडर टाका.

६. यानंतर त्यामध्ये अर्धा कप पाणी टाका. चवीनुसार मीठ टाका. सगळं मिश्रण एकदा हलवून घ्या. ७. त्यानंतर मुठभर मटार टाका आणि सगळ्यात शेवटी किसलेले फ्लॉवर टाका. सगळे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवा. पुन्हा एकदा अर्धा कप पाणी टाका. चिरलेली कोथिंबीर टाका. कढईवर झाकण ठेवा आणि थोडी वाफ येऊ द्या. ८. ३ ते ४ मिनिटांनी कढईतले भरीत एकजीव झाले आहे, असे वाटले की गॅस बंद करा. आपले भरीत आता तयार झाले असून पोळी, पुरी किंवा भाकरीसोबत आपण गरमागरम भरीत खाऊ शकतो. 

 

फ्लॉवर खाण्याचे ५ फायदे Benefits of eating cauliflower- फ्लॉवरमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, के, बी 6 (vitamin c, k anf b6) आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते.- लो कॅलरी डाएट म्हणून फ्लॉवर ओळखले जाते.- फ्लॉवरमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने तो पचनासाठी खूपच चांगला असतो.- फ्लॉवरमध्ये कोलीन मोठ्या प्रमाणावर असते. मज्जासंस्थेचे कार्य अधिक उत्तम होण्यासाठी कोलीन उपयुक्त ठरते.- व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फ्लॉवर खावा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.