घरगुती जेवणात चटणीला कायमच एक वेगळी जागा आहे.(flax seeds chutney) पोळी, भाकरी, भात किंवा अगदी उपवासाच्या पदार्थांसोबत थोडीशी चटणी असेल, तर जेवणाची चव दुप्पट होते. काही चटण्या शरीरासाठीही अतिशय फायदेशीर असतात. त्यातील एक अळशीची चटणी.(flaxseed chutney recipe)
अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.(flax seeds for weight loss) त्यामुळे ही चटणी फक्त चविष्ट नाही तर हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. बहुतेक लोक सॅलड, दही किंवा स्मूदीमध्ये देखील अळशी खातात. हृदयाचे आरोग्य राखण्यास, कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास, पचन सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास अळशी मदत करते.(flaxseed for high blood pressure) त्यांचे दाहक-विरोधी गुणधर्म जळजळ आणि विविध आजार टाळण्यास मदत करतात. अळशीची चटणीही तितकीच गुणकारी आणि चवीला उत्तम असते.(how to make flaxseed chutney) या चटणीचा रोज आहारात समावेश केला तर ब्लड प्रेशर आणि वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होईल. ही चटणी कशी बनवायची पाहूया.
न लाटता झटपट पराठे करण्याची भन्नाट ट्रिक- चवीला मस्त आणि करायला एकदम सोपे
साहित्य
अळशीच्या बिया - ४ चमचे
लसूण - ६-७ पाकळ्या
हिरव्या मिरच्या - २
सुक्या लाल मिरच्या - २
टोमॅटो - १ मध्यम आकाराचा
लिंबाचा रस - १ चमचा
मीठ - चवीनुसार
जिरे - अर्धा चमचा
हळद - एक चिमूटभर
हिरवी कोथिंबीर - बारीक चिरलेली
तेल - १ चमचा
कणिक मळताना ‘हा’ एक सोपा उपाय करा, चपाती कडक अजिबात होणार नाही-पहिल्यांदा करत असाल तरीही..
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला पॅन गरम करुन त्यात अळशीच्या बिया ३ ते ४ मिनिटे व्यवस्थित भाजाव्या लागतील. बिया व्यवस्थित भाजल्यानंतर त्याचा सुगंध येईल. त्या एका ताटात काढून थंड होण्यास ठेवा.
2. आता त्याच पॅनमध्ये तेल चांगले गरम करुन घ्या. त्यात जिरे तडतडू द्या. लसूण, हिरव्या मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या हलके परतवून घ्या. नंतर टोमॅटो घालून ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या.
3. यात हळद घालून पुन्हा चांगले परतवून घ्या. गॅस बंद करा आणि मसाले थंड होऊ द्या. मिक्सरमध्ये भाजलेल्या अळशीच्या बिया, मसाले, मीठ आणि लिंबाचा रस घालून चटणी बनवा. गरज असेल तर थोडे पाणी घाला. तयार चटणी सर्व्हिंग बाऊलमध्ये घेऊन वरुन कोथिंबीर घालून ताटात वाढा.