सकाळच्या घाईत नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न नेहमीच प्रत्येक गृहिणीला सतावतो. यातही जर डोसा खायची इच्छा असेल, तर डाळ-तांदूळ भिजवण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत तासंतास वाट पाहावी लागते. पण आता हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही... घरात असलेल्या साध्या वाटीभर फरसाणपासून आपण हॉटेलसारखा डोसा बनवू शकता. बॅटर न आंबवता, अगदी इन्स्टंट पद्धतीने तयार होणारा हा कुरकुरीत डोसा चवीला इतका भन्नाट लागतो की तुम्ही जुन्या पद्धती विसरून जाल. अनेकदा घरात फरसाणचा चुरा उरतो किंवा फरसाण मऊ पडतं, अशा वेळी ते फेकून न देता त्यापासून एक पौष्टिक आणि कुरकुरीत नाश्ता तयार करता येतो(How To Make Farsan Dosa At Home).
बॅटर आंबवण्याची झंझट नसल्यामुळे हा डोसा तुम्ही कधीही बनवू शकता. विशेष म्हणजे, हा डोसा बनवण्यासाठी फक्त ५ ते १० मिनिटे लागतात. आपण आजवर अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील, पण 'फरसाणचा डोसा' कधी ट्राय केला आहे का? ऐकायला थोडं अजब वाटलं तरी, चवीला हा डोसा कोणत्याही डोशापेक्षा अप्रतिमच लागतो. पाहुणे अचानक घरी आले (Farsaan Dosa Recipe) असतील किंवा मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत (Instant Farsan Dosa Recipe) खावंसं वाटत असेल, तर इन्स्टंट 'फरसाणचा डोसा' ही अत्यंत साधीसोपी आणि चटकन होणारी अशी सोपी रेसिपी आहे.
साहित्य :-
१. फरसाण - १ कप
२. गव्हाचे पीठ - १ कप
३. तांदुळाचे पीठ - १ कप
४. बारीक रवा - १/२ कप
५. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)
६. टोमॅटो - १/२ कप (बारीक चिरलेला)
७. हिरव्या मिरच्या - १ (छोटी बारीक चिरलेली)
८. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
९. जिरे - १/२ टेबलस्पून
१०. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून
११. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
१२. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. हळद - १/२ टेबलस्पून
१४. मीठ - चवीनुसार
१५. पाणी - गरजेनुसार
१६. तेल - गरजेनुसार
कृती :-
१. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात फरसाण घालून ते मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी.
२. एका मोठ्या बाऊलमध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या फरसाणचा चुरा घेऊन त्यात गव्हाचे आणि तांदुळाचे पीठ तसेच बारीक रवा घालावा.
पनीरची अशी भाजी कधीच खाल्ली नसेल! हॉटेलची चव विसराल जेव्हा घरीच कराल झणझणीत 'पनीर खिमा मसाला'...
हॉटेलसारखी परफेक्ट, चटपटीत आणि चव जिभेवर रेंगाळणारी 'तडका डाळ' तयार करण्याची सोपी आणि अचूक रेसिपी...
३. त्यानंतर या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं - लसूण पेस्ट, जिरे, चिली फ्लेक्स, लाल तिखट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी तेल घालून पातळ कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करून घ्यावे.
४. पॅनला थोडे तेल लावून त्यावर तयार बॅटर घालून गोलाकार आकारात पसरवून घ्यावे. २ ते ३ मिनिटे डोसा खरपूस भाजून होईपर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावा.
डाळ - तांदूळ न भिजवता, बॅटर न आंबवता अगदी इन्स्टंट पद्धतीने वाटीभर फरसाणचा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी तयार आहे. हा डोसा आपण चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.
