बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटीज खाण्याचे शौकीन आहेत. या सेलिब्रिटीजना वेगवेगळ्या प्रकारचे तसेच मस्त खमंग चवीचे आणि जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खायला (Farah Khan loves 'Chatpate Aloo Ki Sabzi') खूपच आवडतात. या सगळ्या खादाड ( Farah Khan's SECRET Love for ALOO) आणि चवीने खाणाऱ्या सेलिब्रिटीजपैकी एक म्हणजेच फराह खान.फराह खान बॉलिवूडमधील एक उत्तम डायरेक्टर, डान्सर, कोरिओग्राफर तर आहेच पण सोबतच ती तितकीच फुडी देखील आहे. फराहला वेगवेगळ्या चवींचे पदार्थ स्वतःला करायला आणि करुन खाऊ घालायला खूप आवडतात(farah khan favorite sukha yallow aloo recipe).
फराह नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिने तयार केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे तसेच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिला आवडणाऱ्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी सांगणारा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती 'चटपटे आलू' तयार करताना दिसत आहे. बटाटा हा खरंतर, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. गृहिणींना देखील झटपट स्वयंपाक आवरायचा असेल किंवा भाजीला काय करायचं असा प्रश्न पडला की आपण अगदी झटपट होणारी बटाट्याची भाजी करतो. नेहमीची तीच ती बटाट्याची भाजी तयार करण्यापेक्षा एकदा फराहला आवडते त्या पद्धतीने 'चटपटे आलू' तयार करुन पाहा. फराह खानचा आवडता पदार्थ असलेले 'चटपटे आलू' कसे करायचे याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तेल - २ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. मोहरी - १ टेबलस्पून ४. कडीपत्ता - ६ ते १० पानं ५. मीठ - चवीनुसार६. हळद - १ टेबलस्पून ८. कच्च्या बटाट्याचे काप - २ कप ९. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून १०. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या
फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट थालीपीठ, चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच खमंग...
खरबुजाच्या बिया फायदेशीर ! १ भन्नाट ट्रिक, महागामोलाचे मगज बी विकत आणायची गरजच नाही...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे व मोहरी फोडणीला घालावे. २. आता यात कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. ३. या तयार खमंग फोडणीत हळद आणि चवीनुसार मीठ घालावे.
पनीर तळल्यानंतर रबरासारखे चिवट होते? १ साधीसोपी ट्रिक - तळल्यानंतरही पनीर राहील मऊमुलायम...
४. सगळ्यांत शेवटी यात कच्च्या बटाट्याचे काप किंवा तुकडे घालून खमंग फोडणीत चांगले परतून घ्यावे. ५. आता झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. ६. वाफ काढून झाल्यानंतर यात लिंबाचा रस घालून भाजी चमच्याने हलवून घ्यावी.
मस्त चटपटे आलू खाण्यासाठी तयार आहे. आपण चपाती किंवा अगदी गरमागरम वरण - भातासोबत ही चटपटीत आलूची भाजी खाऊ शकता.