उन्हाळा म्हटलं की आंबा, फणस खाण्याचा सिझन. या ऋतूंत येणारी ही दोन्ही फळं प्रत्येक घरोघरी मोठ्या आवडीने खाल्ली जातात. आंबा, फणस खाण्यासोबतच त्याचे वेगवेगळे चविष्ट (fansachi bhaji recipe) पदार्थ देखील केले जातात. फणसाचे गोड, रसाळ गरे खाणे (Malvani Jackfruit Recipe) म्हणजे सुखः. हाच फणस कच्चा (Traditional Jackfruit Sabji Recipe) असताना त्याची भाजी तयार केली जाते. फणसाची भाजी सुकी आणि रस्सेदार ग्रेव्ही असणारी अशा दोन पद्धतीने करता येते. उन्हाळ्यात फणस घरी आणला की, हमखास फणसाची मस्त चमचमीत भाजी करण्याचा बेत आखला जातो( How To Make Malvani Jackfruit Sbaji).
प्रत्येक सिझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याकडे केल्या जातात. कोकणातील काही भागात उन्हाळ्यात कच्च्या फणसाची भाजी केली जाते. ही फणसाची मस्त चमचमीत रस्सेदार भाजी आपण चपाती किंवा भातासोबत देखील खाऊ शकतो. कोकणाची खासियत असलेली ही कच्च्या फणसाची भाजी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. कच्चा फणस - २ कप
२. सुकं खोबरं - १ कप
३. कांदा - १ कप
४. आलं - १ छोटा तुकडा
५. लसूण पाकळ्या - १० पाकळ्या
६. टोमॅटो - १ कप
७. मालवणी मसाला - १ टेबलस्पून
८. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
९. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१०. धणेपूड - १ टेबलस्पून
११. हळद - १ टेबलस्पून
१२. कोथिंबीर - २ टेबलस्पून
१३. पाणी - गरजेनुसार
१४. मीठ - चवीनुसार
१५. तेल - २ ते ३ टेबलस्पून
फक्त १० मिनिटांत करा आंब्याचा मऊ - लुसलुशीत शिरा, एकदा कराल टेस्ट तर म्हणाल बेस्ट...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ आणि हळद घालावे. या पाण्यांत कच्च्या फणसाचे छोटे तुकडे घालून ते ५ मिनिटे व्यवस्थित उकडवून घ्यावे.
२. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात सुकं खोबरं २ ते ३ मिनिटे भाजून घ्याव. त्याच पॅनमध्ये सुकं खोबरं भाजल्यानंतर, कांदा - टोमॅटो, आलं, लसूण पाकळ्या भाजून घ्याव्यात.
३. हे भाजून घेतलेलं मिश्रण थोडं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यावे.
फराह खानला आवडते 'चटपटे आलू की सब्जी'! पाहा तिची रेसिपी, एकदा खाल्ली तर पुन्हा कराल...
४. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात तयार वाटण घालावे. मग त्यात मालवणी मसाला, लाल तिखट मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, धणेपूड, हळद घालावी.
५. वाटण तेलावर चांगले परतून घेतल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी घालावे. त्यानंतर यात कच्च्या फणसाच्या उकडवून घेतलेल्या फोडी घालाव्यात.
६. मग झाकण ठेवून एक हलकी उकळी काढून घ्यावी. सगळ्यांत शेवटी वरुन कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी.
कच्च्या फणसाची रस्सेदार ग्रेव्ही असणारी भाजी खाण्यासाठी तयार आहे. आपण ही मस्त चमचमीत भाजी भात किंवा चपाती सोबत खाऊ शकतो.