तोंडातून सारखा वास येतो? मग कोणाशीही बोलताना लाज वाटते. कांद्यासारखे पदार्थ खाल्यावरही तोंडात दुर्गंध बराच वेळ राहतो. (Eat these 6 foods, say good bye to bad breath) त्यामुळे आपण बरेचदा कच्चा कांदा खाण्याची इच्छा असली तरी खाणं टाळतो. हा वास जावा म्हणून विकतचे माऊथ फ्रेशनर आपण वापरतो. जसं शरीराला चांगला वास यावा म्हणून सेंट वापरतात. (Eat these 6 foods, say good bye to bad breath)तसेच तोंडाला चांगला वास यावा म्हणून माऊथ फ्रेशनर वापरला जातो. पण दातांसाठी असे फ्रेशनर सतत वापरणे चांगले नाही. काही नैसर्गिक पदार्थ आहेत, जे हा वास थांबवू शकतात.
१. वेलची(Eat these 6 foods, say good bye to bad breath)
वेलची फ्रेशनर म्हणून एकदम मस्त उपाय आहे. तोंडाला वास यायला लागला की, लगेच एक वेलची खायची. वेलची लहानशा डब्यात घेऊन कॅरी करायलाही सोपी. सतत वेलची चघळत राहायची त्याचे दुष्परिणाम नाहीत. चोथा झाला की टाकून द्यायचा.
२. बडीशेप
जेवल्यानंतर आपण बडीशेप खातो. त्यामुळे पचन चांगले होते. त्याचप्रमाणे तोंडाचा वासही जातो. भाजलेली बडीशेप तर उत्तमच. शरीरासाठी गुणकारी ही आहे.
३.जेष्ठमध
जेष्ठमधाचे लहान-लहान तुकडे करून घ्यायचे. एका डबीत घालून बरोबर ठेवायचे. एक तुकडा चघळत राहायचा. ते पोटासाठी सर्दीसाठी व खोकल्यासाठीही औषधी आहे.
४. होममेड फ्रेशनर
पाण्यामध्ये मीठ घाला. नंतर मीठाच्या पाण्यात पेपरमींट ऑइलचे काही थेंब घाला. त्या पाण्याने खळखळून चूळ भरा. तोंडाचा वास जातो. तयार करायलाही सोपे आहे. कोणतीही रसायने वापरलेली नाहीत.
५. मुखवास
बडीशेप परतून घ्या. त्यात ओवाही घाला. तोही छान परतून घ्या. त्यात भाजलेले धने घाला. सगळं छान परतून घ्या. त्यात थोडी पिठीसाखर घाला. थोडासा गुलकंद घाला. सगळ्याचे मस्त मिश्रण करून घ्या. घरच्या घरी भारी मुखवास तयार करता येतो. जेवणानंतर खा.
६. लवंग
प्रवासात किंवा पित्ताच्या उलट्या झाल्यावर लवंग चघळतात. कारण लवंग चघळल्याने तोंडातील घाण वास नाहीसा होतो. त्यामुळे चिविंगमपेक्षा लवंग चघळा.
दात व्यवस्थित घासल्यावरही तोंडाला वास येतो. त्याचे कारण आपण जीभ नीट साफ करत नाही. जीभ स्वच्छ असेल, तर तोंडाला वास येत नाही. तरी आलाच तर हे घरगुती उपाय करून बघा.