सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळच्या चहाची वेळ, आपल्याला नेहमीच काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा असते. बहुतेक घरांमध्ये नाश्त्याला पोहे किंवा उपमा बनवला जातो, पण रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.(Rava cutlet recipe) अशा वेळी घरातील गृहिणींना प्रश्न पडतो की, घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातून असे काय वेगळे बनवावे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. (Semolina cutlet)आपल्याकडे रवा आणि घरातील काही मोजक्या भाज्या असतील, तर अवघ्या काही मिनिटांत हॉटेलसारखे रवा कटलेट तयार करू शकता. अनेकदा आपण बटाटा वडा किंवा ब्रेड रोल बनवतो, पण त्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. रव्याचे कटलेट हे कमी तेलात शॅलो फ्राय करूनही तितकेच चविष्ट लागतात.(Kids tiffin recipes) अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया, साध्या रव्याला 'चविष्ट ट्विस्ट' कसा द्यायचा, पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
महागडी पैठणी नेसली की बोंगा दिसू नये म्हणून ५ टिप्स, १५ मिनिटांत नेसा पैठणी चापूनचोपून
साहित्यतेल- २ लहान चमचेलसूण- १ इंच (बारीक चिरलेला)हिरवी मिरची- २ (बारीक चिरलेली)कांदा- १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)सिमला मिरची- १/२ मध्यम आकाराची (बारीक चिरलेली)गाजर- १ ते २ मध्यम आकाराचे (बारीक चिरलेले)मटार- १/२ लहान कपरवा - १ मोठा कपमीठ- १ लहान चमचा (चवीनुसार)कोथिंबीर- २ लहान चमचे (बारीक चिरलेली)ब्रेड क्रम्ब्स - कोटिंगसाठीपाणी- २ मोठे कपमैदा- २ लहान चमचेकॉर्न फ्लोअर- २ लहान चमचेलाल तिखट- १/२ लहान चमचाकाळी मिरी पूड- १/३ लहान चमचापाणी- १/३ कप
कृती
1. सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा परतवून घ्या. नंतर वाटाणे, गाजर, शिमला मिरची घालून परतवून घ्या. वरुन पाणी आणि मीठ घाला.
2. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात रवा घाला. त्यातील पाणी आटवून घ्या. वरुन कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करा.
3. हाताने सारण मॅश करुन त्याला गोलाकार द्या. एका ताटात मैदा, कॉर्न फ्लोअर, लाल मिरची पावडर, काळी मिरी पूड, मीठ आणि पाणी घालून त्याचे पातळ मिश्रण तयार करा. कटलेट त्यामध्ये डीप करा. वरुन ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.
4. पॅनमध्ये तेल गरम करुन शॅलो फ्राय करा. चटणी किंवा सॉससोबत खा गरमागरम- कुरकुरीत रव्याचे कटलेट
Web Summary : Make crispy semolina cutlets easily at home with few ingredients. This low-oil snack is perfect for kids' tiffin or a quick evening treat. Mix semolina with vegetables, shape, coat, and shallow fry for a delicious, healthy alternative to fried snacks.
Web Summary : कुछ सामग्री के साथ आसानी से घर पर कुरकुरे सूजी कटलेट बनाएं। यह कम तेल वाला नाश्ता बच्चों के टिफिन या शाम के त्वरित नाश्ते के लिए एकदम सही है। सूजी को सब्जियों के साथ मिलाएं, आकार दें, कोट करें और तले हुए स्नैक्स के स्वादिष्ट, स्वस्थ विकल्प के लिए शैलो फ्राई करें।