Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मुलांच्या डब्यासाठी टेस्टी पर्याय! रव्याचे कटलेट करण्याची सोपी पद्धत- कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ

मुलांच्या डब्यासाठी टेस्टी पर्याय! रव्याचे कटलेट करण्याची सोपी पद्धत- कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ

Rava cutlet recipe: Semolina cutlet: Kids tiffin recipes: साध्या रव्याला 'चविष्ट ट्विस्ट' कसा द्यायचा, पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2026 09:30 IST2026-02-12T09:30:00+5:302026-02-12T09:30:03+5:30

Rava cutlet recipe: Semolina cutlet: Kids tiffin recipes: साध्या रव्याला 'चविष्ट ट्विस्ट' कसा द्यायचा, पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

easy rava cutlet recipe for kids tiffin how to make semolina cutlets with less oil healthy and crispy snack for school lunch box quick kids tiffin recipe in 15 minutes | मुलांच्या डब्यासाठी टेस्टी पर्याय! रव्याचे कटलेट करण्याची सोपी पद्धत- कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ

मुलांच्या डब्यासाठी टेस्टी पर्याय! रव्याचे कटलेट करण्याची सोपी पद्धत- कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळच्या चहाची वेळ, आपल्याला नेहमीच काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा असते. बहुतेक घरांमध्ये नाश्त्याला पोहे किंवा उपमा बनवला जातो, पण रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.(Rava cutlet recipe) अशा वेळी घरातील गृहिणींना प्रश्न पडतो की, घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यातून असे काय वेगळे बनवावे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. (Semolina cutlet)
आपल्याकडे रवा आणि घरातील काही मोजक्या भाज्या असतील, तर अवघ्या काही मिनिटांत हॉटेलसारखे रवा कटलेट तयार करू शकता. अनेकदा आपण बटाटा वडा किंवा ब्रेड रोल बनवतो, पण त्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. रव्याचे कटलेट हे कमी तेलात शॅलो फ्राय करूनही तितकेच चविष्ट लागतात.(Kids tiffin recipes) अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया, साध्या रव्याला 'चविष्ट ट्विस्ट' कसा द्यायचा, पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती 

महागडी पैठणी नेसली की बोंगा दिसू नये म्हणून ५ टिप्स, १५ मिनिटांत नेसा पैठणी चापूनचोपून

साहित्य
तेल- २ लहान चमचे
लसूण- १ इंच (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची- २ (बारीक चिरलेली)
कांदा- १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
सिमला मिरची- १/२ मध्यम आकाराची (बारीक चिरलेली)
गाजर- १ ते २ मध्यम आकाराचे (बारीक चिरलेले)
मटार- १/२ लहान कप
रवा - १ मोठा कप
मीठ- १ लहान चमचा (चवीनुसार)
कोथिंबीर- २ लहान चमचे (बारीक चिरलेली)
ब्रेड क्रम्ब्स - कोटिंगसाठी
पाणी- २ मोठे कप
मैदा- २ लहान चमचे
कॉर्न फ्लोअर- २ लहान चमचे
लाल तिखट- १/२ लहान चमचा
काळी मिरी पूड- १/३ लहान चमचा
पाणी- १/३ कप

कृती 

1. सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा परतवून घ्या. नंतर वाटाणे, गाजर, शिमला मिरची घालून परतवून घ्या. वरुन पाणी आणि मीठ घाला. 

2. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात रवा घाला. त्यातील पाणी आटवून घ्या. वरुन कोथिंबीर घालून पुन्हा एकजीव करा. 

3. हाताने सारण मॅश करुन त्याला गोलाकार द्या. एका ताटात मैदा, कॉर्न फ्लोअर, लाल मिरची पावडर, काळी मिरी पूड, मीठ आणि पाणी घालून त्याचे पातळ मिश्रण तयार करा. कटलेट त्यामध्ये डीप करा. वरुन ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्या. 

4. पॅनमध्ये तेल गरम करुन शॅलो फ्राय करा. चटणी किंवा सॉससोबत खा गरमागरम- कुरकुरीत रव्याचे कटलेट
 


Web Title : सूजी कटलेट रेसिपी: बच्चों के लिए एक स्वादिष्ट और सेहतमंद नाश्ता

Web Summary : कुछ सामग्री के साथ आसानी से घर पर कुरकुरे सूजी कटलेट बनाएं। यह कम तेल वाला नाश्ता बच्चों के टिफिन या शाम के त्वरित नाश्ते के लिए एकदम सही है। सूजी को सब्जियों के साथ मिलाएं, आकार दें, कोट करें और तले हुए स्नैक्स के स्वादिष्ट, स्वस्थ विकल्प के लिए शैलो फ्राई करें।

Web Title : Semolina Cutlet Recipe: A Tasty and Healthy Snack for Kids

Web Summary : Make crispy semolina cutlets easily at home with few ingredients. This low-oil snack is perfect for kids' tiffin or a quick evening treat. Mix semolina with vegetables, shape, coat, and shallow fry for a delicious, healthy alternative to fried snacks.