Join us  

एक आंबा-२ ब्रेड स्लाईज, झटपट मँगो कुल्फी करण्याची कुल रेसिपी; खा गारेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 3:32 PM

Easy no cook mango kulfi recipe-check out easy kulfi recipe : आंबा प्रेमींनी जरूर ट्राय करावी ही मँगो कुल्फीची सोपी रेसिपी; १० मिनिटात कुल्फी रेडी

वर्षभर आंबाप्रेमी आंब्याची वाट पाहतात. गोड, रसाळ आंबा खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे (Kulfi Recipe). आंबाप्रेमी आंबा खाण्याचा एकही दिवस चुकवत नाही. आंब्याचे अनेक पदार्थ केले जातात. मँगो कुल्फी, मँगो लस्सी, मँगो पेढा, मँगो खीर यासह मँगो कुल्फी आवडीने खाल्ली जाते (Cooking Tips). जर आपण आंबा प्रेमींपैकी एक असाल तर, घरात एकदा मँगो कुल्फी करून पाहा. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत (Easy Kulfi Recipe). या दिवसात थंडगार पदार्थ आवडीने खाल्ले जातात. आईस्क्रीम, फालूदा यासह कुल्फी शरीराला आणि मनाला गारवा देतात (Summer Special).

पण आपण कधी आंब्याची घरात कुल्फी करून पाहिली आहे का? लहाग्यांसह मोठ्यांनासुद्धा थंडगार मँगो कुल्फी नक्कीच आवडेल. काही लोकं वेळखाऊ काम म्हणून कुल्फी करणं टाळतात. तर काहींना कुल्फी करायला जमत नाही. जर आपल्याला सोप्या पद्धतीने घरात मँगो कुल्फी करायची असेल तर, ही रेसिपी एकदा करून पाहा(Easy no cook mango kulfi recipe-check out easy kulfi recipe).

मँगो कुल्फी करण्यासाठी लागणारं साहित्य

आंबे

ब्रेड

पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

रबडी

दूध

ड्रायफ्रुट्स

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एका आंब्याचा गर घाला. नंतर त्यात २ ब्रेड स्लाईज, अर्धा कप रबडी आणि कप दूध घालून स्मूथ पेस्ट तयार करा. मिक्सरमध्ये दोन ते तीन वेळा ब्लेंड करा, जेणेकरून कुल्फीचे मिश्रण पूर्णपणे गुळगुळीत तयार होईल आणि कुल्फी व्यवस्थित सेट होईल. हवं असल्यास आपण त्यात ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता. जेणेकरून कुल्फीची चव थोडी क्रंची लागेल.

कपभर रवा अन् दही, करा विकतसारखा मऊसूत- पांढरा ढोकळा; पाहा इन्स्टंट रेसिपी

आता कुल्फीच्या साच्यात आंब्याचे काही तुकडे घाला. त्यात आंब्याचे मिश्रण ओता. त्यावर अ‍ॅल्युमिनियम फॉईल पेपर लावून कव्हर करा. नंतर सुरीने छिद्र पाडा.  त्या छिद्रांमध्ये आईस्क्रीम स्टिक्स ठेवा. शेवटी सेट करण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवा. ७ ते ८ तास झाल्यानंतर फ्रीजरमधून बाहेर काढा. अशा प्रकारे मँगो कुल्फी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स