Join us

दिवाळीत पार्टी स्नॅक्सची धम्माल! १० मिनिटांत तयार करा मुगडाळ नमकीन - कुरकुरीत, तिखट आणि अगदी मार्केटसारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 15:03 IST

Moong dal namkeen recipe: Crispy namkeen: Easy 10-minute snacks: पाहुणे अचानक आले तरी तुम्हाला काही विशेष तयारीची गरज नाही, फक्त १० मिनिटांत तयार होईल मार्केटसारखी स्नॅक डिश.

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रकाश, गोडाचे पदार्थ आणि घरभर दरवळणारा फराळाचा सुगंध.(Moong dal namkeen recipe) या दिवसांत पाहुण्याची रेलचेल जास्त प्रमाणात पाहायला मिळते.(Diwali snacks) घरात पाहुणे मंडळी आली की, घर देखील अगदी भरलेलं वाटतं पण अशावेळी नेमका झटपट काही खास स्नॅक्स हवा असतो. गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, म्हणून तिखट झणझणीत पदार्थ खावेसे वाटतात.(Easy 10-minute snacks) बाजारात विविध पदार्थ सहज मिळतात,पण घरी सोप्या पद्धतीने १० मिनिटांत होणारी कुरकुरीत मुगडाळ नमकीन आपल्याला करता येईल. (Diwali recipes 2025)दिवाळीच्या दिवसात गोडाच्या पदार्थांनी आपले पोट भरलेले राहते. अनेकदा अपचनाचा त्रास होतो. आपल्याला तिखट काही तरी खावेसे वाटते.(10-minute snacks for guests at home) चहासोबत काहीतरी तिखट आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा हमखास होते.(Quick and tasty Indian namkeen snack) अशा वेळी ही मुगडाळ नमकीन अगदी परफेक्ट पर्याय ठरते. शिवाय, पाहुणे अचानक आले तरी तुम्हाला काही विशेष तयारीची गरज नाही, फक्त १० मिनिटांत तयार होईल मार्केटसारखी स्नॅक डिश.

पश्चिम महाराष्ट्रातील दिवाळी फराळातला झणझणीत पदार्थ, पारंपरिक लाटी वडी! तेलकट होऊन नये म्हणून ३ टिप्स

साहित्य 

धुतलेली मूगडाळ - १ कप मीठ - चवीनुसार हळद - १/४ चमचा लाल तिखट - १/४ चमचा चाट मसाला - अर्धा चमचातेल तळण्यासाठी 

कृती 

1. मुगडाळ नमकीन बनवण्यासाठी सगळ्यात आधी दोन पाण्याने डाळ व्यवस्थित धुवा. नंतर ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ मऊ होईल आणि तळल्यानंतर कुरकुरीत लागेल. 

2. डाळ भिजल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाका आणि स्वच्छ कापडावर पसरवा. २० ते ३० मिनिटे सुकू द्या. डाळ सुकलेली असायला हवी. ओलावा राहिला तर लवकर खराब होईल. 

3. आता पॅनमध्ये पुरेशा प्रमाणात तेल गरम करा आणि चांगले गरम झाल्यानंतर मंद आचेवर मुगाची डाळ थोडी थोडी करुन घाला. सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा, ५ ते ६ मिनिट लागेल. 

4. आता तळलेली डाळ चाळणीतून काढा आणि टिश्यू पेपरवर ठेवा ज्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.

5. गरम मूग डाळीत मीठ, लाल तिखट, हळद आणि चाट मसाला घालून चांगले मिसळा. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडी काळी मिरी पावडर किंवा आमचूर पावडर देखील घालू शकता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Delight: Quick Moong Dal Namkeen Recipe for Festive Snacking

Web Summary : Make crispy, spicy Moong Dal Namkeen in 10 minutes! Perfect for Diwali guests or a quick, tasty snack. Enjoy this easy alternative to sweets during the festive season. Customize with spices for extra flavor.
टॅग्स :दिवाळी २०२५अन्नपाककृती