Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Diwali Faral : चकली फसते- कडक होते? पिठात मिसळा 'हे' पदार्थ- गव्हाची चकली होईल मस्त कुरकुरीत

Diwali Faral : चकली फसते- कडक होते? पिठात मिसळा 'हे' पदार्थ- गव्हाची चकली होईल मस्त कुरकुरीत

Diwali chakli recipe: crispy chakli tips: moong chakli recipe: wheat chakli recipe: पीठ मळताना काही सोप्या ट्रिक वापरल्या तर गव्हाच्या पिठाची चकली एकदम कुरकुरीत आणि खमंग होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2025 09:30 IST2025-10-08T09:30:00+5:302025-10-08T09:30:01+5:30

Diwali chakli recipe: crispy chakli tips: moong chakli recipe: wheat chakli recipe: पीठ मळताना काही सोप्या ट्रिक वापरल्या तर गव्हाच्या पिठाची चकली एकदम कुरकुरीत आणि खमंग होईल.

easy Diwali chakli recipe with moong dal and wheat why does chakli become hard while frying how to make chakli crispy and tasty at Home | Diwali Faral : चकली फसते- कडक होते? पिठात मिसळा 'हे' पदार्थ- गव्हाची चकली होईल मस्त कुरकुरीत

Diwali Faral : चकली फसते- कडक होते? पिठात मिसळा 'हे' पदार्थ- गव्हाची चकली होईल मस्त कुरकुरीत

दिवाळी म्हटलं की रोषणाई, आकाश कंदील आणि खमंग फराळाचा सुवास सारीकडे दरवळत असतो. फराळाच्या ताटात चिवडा, शंकरपाळ्या, करंजी, नानकटाई आणि चकली हमखास असते.(Diwali chakli recip) पण अनेकदा पदार्थ करताना ते फसरतात. फासरे चांगले बनत नाही.(crispy chakli tips) या फसणाऱ्या पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे चकली. अनेकदा उत्साहात आपण चकली बनवतो पण ती कडक होते, फुटते किंवा आतून कच्ची राहते. ज्यामुळे आपला सगळा मूड खराब होतो.( moong chakli recipe) चकली बनवताना आपल्याला अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. घरी इतका पसरा करण्यापेक्षा आपण विकतच्या चकलीला जास्त प्राधान्य देतो. (how to make chakli crispy)
जर आपल्यालाही घरच्या घरी झटपट, कुरकुरीत आणि चवीदार चकली बनवायची असेल, तर काळजी करु नका. पीठ मळताना काही सोप्या ट्रिक वापरल्या तर गव्हाच्या पिठाची चकली एकदम कुरकुरीत आणि खमंग होईल.(chakli not turning crispy) ही चकली कशी बनवायची पाहूया. 

करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? ७ टिप्स - होतील खुसखुशीत, एकही करंजी फुटणारी नाही

साहित्य 

पिवळी मुगाची डाळ - १ कप 
पाणी - २ कप 
हळद - १ चमचा
हिंग - २ चमचे 
गव्हाचे पीठ - ४ कप 
लाल मिरची पावडर - १ चमचा 
ओवा - अर्धा चमचा 
तीळ - २ चमचे 
धने पावडर - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
तेल - तळण्यासाठी 

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला मुगाची डाळ व्यवस्थित दोन पाण्याने धुवून घ्यावी लागेल. त्यानंतर त्यात कपभर पाणी घालून हळद आणि हिंग घाला. आता एका डब्यात सुती कापड घेऊन त्यात गव्हाचे पीठ घाला आणि तो कापड बांधून ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये १५ ते २० मिनिटे वाफ काढून घ्या. शिट्ट्या होऊ देऊ नका.

2. एका चाळणीमध्ये गव्हाचे वाफवलेले पीठ घेऊन त्याच्या झालेल्या गाठी हाताने फोडा. आणि पीठ व्यवस्थित चाळून घ्या. आता वाफवलेली मुगाची डाळ चाळणीत घेऊन व्यवस्थित घोटून घ्या. त्याची तयार पेस्ट आता गव्हाच्या पिठात घाला. त्यात लाल मिरची पावडर, तीळ, हळद, धनेपूड आणि मीठ घाला. वरुन ओवा हातावर चोळून घाला. हाताने पीठ व्यवस्थित मळून घ्या. 

3. पीठाच्या गोळ्याचा चांगला मसाज करुन घ्या. चकलीच्या साच्यात गोळा भरुन चकल्या पाडा. आता कढईत तेल गरम करुन मंद आचेवर बुडबुडे जाईपर्यंत तळून घ्या. तयार होईल खमंग खुसखुशीत मूग- गव्हाची चकली. 


Web Title : दिवाली फराळ: इस गेहूं के आटे की रेसिपी से घर पर बनाएं कुरकुरी चकली

Web Summary : कठोर या टूटी हुई चकली से परेशान हैं? इस दिवाली, गेहूं के आटे और कुछ आसान युक्तियों का उपयोग करके एकदम सही, कुरकुरी चकली बनाएं। स्वादिष्ट परिणाम के लिए रेसिपी में मूंग दाल और सामान्य मसालों का उपयोग किया गया है।

Web Title : Diwali Faral: Make crispy Chakli at home with this wheat flour recipe.

Web Summary : Struggling with hard or broken Chakli? This Diwali, make perfect, crispy Chakli using wheat flour and a few simple tricks. The recipe uses moong dal and common spices for a delicious result.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.