Join us  

ना लाटणे-ना पीठ मळणे; कपभर चणा डाळीचे करा कुरकुरीत पापड; तेलात तळताच फुलतील दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 1:49 PM

Easy and Tasty Chana dal papad- Check out Crispy Recipe : तांदूळ, उडदाचे पापड खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा चणा डाळीचे पापड करून पाहा..

उन्हाळा सुरु झाला की, महिलावर्ग वाळवणाच्या तयारीला लागतात (Summer Special). वाळवण म्हटलं की पापड, कुरडई, पळी पापड यासह लोणचे आवर्जुन केले जाते (Papad Recipe). पण अनेकांना वळवणासाठी वेळ मिळेलच असे नाही. बऱ्याच घरांमध्ये पळी पापड केले जाते. पळी पापड झटपट आणि कमी वेळात तयार होतात. तांदूळ, उडीद डाळ, टोमॅटोचे पळी पापड आपण खाल्लेच असतील.

पण कधी चणा डाळीचे पळी पापड खाऊन पाहिलं आहे का? बहुतांश घरात चणा डाळीचा वापर पुरणपोळी, चणा डाळीचे वडे, कटाची आमटीसाठी होतो. पण जर आपल्याला त्याच प्रकारचे पापड खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा चणा डाळीचे पळी पापड करून पाहा. कुरकुरीत पापड चवीला भन्नाट लागतात(Easy and Tasty Chana dal papad- Check out Crispy Recipe).

चणा डाळीचे पळी पापड करण्यासाठी लागणारं साहित्य

चणा डाळ

पाणी

कॉर्न फ्लोर

कडीपत्ता

चिली फ्लेक्स

विशीतच वजन वाढले-हाडांचीही समस्या छळते? 'या' तेलात शिजवा अन्न; पन्नाशीतही राहाल फिट

जिरे

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप चणा डाळ घ्या. त्यात पाणी घालून डाळ धुवून घ्या. डाळी धुवून घेतल्यानंतर त्यात पाणी घालून डाळ भिजत ठेवा. ५ ते ६ तासात डाळ व्यवस्थित भिजेल. मिक्सरच्या भांड्यात भिजलेली चणा डाळ काढून घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना जास्त पाणी घालू नका. २ चमचे पाणी घाला.

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप पाणी घालून मिक्स करा. आता एक मोठं भांडं घ्या. त्यावर एक चाळण ठेवा, चाळणीत चणा डाळीचं पाणी ओतून गाळून घ्या. नंतर त्यात पुन्हा २ कप पाणी घाला. भांडं गॅसवर ठेवा. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. एका बाऊलमध्ये एक चमचा कॉर्न फ्लोर घ्या. त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा.

लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

तयार कॉर्न फ्लोर पेस्ट चणा डाळीच्या बॅटरमध्ये घालून मिक्स करा. बॅटरला घट्टपणा आल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कडीपता, २ चमचा चिली फ्लेक्स, एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा.

आता प्लास्टिक पेपरला ब्रशने थोडं तेल लावा. चमचाभर मिश्रण पेपरवर ओता, आणि हलक्या हाताने पसरवा. २ दिवसांसाठी उन्हात वाळत ठेवा. व्यवस्थित वाळल्यानंतर पापड हवाबंद डब्यात साठवून ठेवा. जेव्हा इच्छा होईल, तेव्हा तेलात तळून खा. तळल्यानंतर पळी पापड दुप्पट फुलतात.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स