Join us

अस्सल साऊथ इंडियन चवीचे आप्पे खाऊन तर पाहा, डाळ-तांदळाचा साधा पदार्थ पण चव अफलातून भारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:17 IST

Rice Appe recipe : आपण काही वेगळं ट्राय करू शकता जे लगेच तयार होईल आणि टेस्टी सुद्धा असेल. ती म्हणजे तांदळाचे अप्पे. आता हे कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत.

Rice Appe recipe : सामान्यपणे प्रत्येक घरात रोज सकाळचा नाश्ता हा पोहे किंवा उपमा असतो. ऑफिसला जायच्या घाईत हा नाश्ता बेस्ट मानला जातो. पण रोज रोज तेच खाऊन कंटाळा देखील येतो. अशात आपण काही वेगळं ट्राय करू शकता जे लगेच तयार होईल आणि टेस्टी सुद्धा असेल. ती म्हणजे तांदळाचे अप्पे. आता हे कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत.

राईस अप्पे

हलके, मऊ आणि कुरकुरीत असे हे छोटे गोलगोल अप्पे चवीला अप्रतिम आणि बनवायला अगदी सोपे आहेत. कमी तेलात तयार होणारा हा नाश्ता तुमच्या पोटाला आरामदायी आणि मनाला प्रसन्न ठेवेल.

साहित्य

तांदूळ – 1 कप

उडीद डाळ – ¼ कप

मेथी दाणे – ¼ छोटा चमचा

मीठ – चवीनुसार

हिरवी मिरची – 1 ते 2

आले – 1 तुकडा

कढीपत्ता – 5 ते 6 पाने

कोथिंबीर – 2 मोठे चमचे

कांदा – 1 मध्यम

गाजर / ढोबळी मिरची – 2 मोठे चमचे

मोहरी – ½ छोटा चमचा

तेल – फार थोडं

कसे बनवाल?

स्टेप 1 –

बॅटर तयार करा. तांदूळ आणि उडीद डाळ नीट धुवून 5-6 तास भिजवून ठेवा. मग मिक्सरमध्ये बारीक वाटून गुळगुळीत पेस्ट बनवा. हे मिश्रण 6-8 तास गरम ठिकाणी ठेवा म्हणजे त्याला खमीर येईल. खमीर उठल्यावर अप्पे मऊ आणि फुलेदार बनतात.

स्टेप 2

बॅटरमध्ये मीठ, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर मिसळा. आवडीनुसार कांदा, कढीपत्ता, गाजर किंवा ढोबळी मिरचीही टाका. वेळ कमी असल्यास थोडं ईनो किंवा बेकिंग सोडा घालून झटपट तयार करू शकता.

स्टेप 3

अप्पे पॅन गरम करून प्रत्येक खोबणीत एक थेंब तेल टाका. त्यात थोडी मोहरी टाकून फोडणी द्या. आता बॅटर घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर 3-4 मिनिटे शिजवा.

स्टेप 4

एक बाजू सोनेरी झाल्यावर अप्पे पलटवा. दुसरी बाजूही तांबूस कुरकुरीत होईपर्यंत परतवा. प्लेटमध्ये काढून नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Tired of Poha? Try Rice Appe for a Quick Breakfast!

Web Summary : Bored of the usual breakfast? Rice Appe is a quick, tasty, and healthy alternative. Made with rice, lentils, and spices, it’s easy to prepare and can be served with chutney or sambar.
टॅग्स :अन्नपाककृती