अनेकदा सकाळच्या नाश्त्यात काय बनवायचं असा प्रश्न गृहिणींना पडतो. पोहे, उपमा किंवा रोज तेच ते पदार्थ खाऊन घरच्यांना देखील वैताग येतो.(Ragi thalipeeth recipe) आपल्या महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यात विविध पदार्थ केले जातात.(Nachni thalipeeth) पण सगळ्यात जास्त आणि पोटभरीचा पदार्थ अर्थात थालीपीठ.(Healthy breakfast recipe) वरुन तुपाची धार किंवा लोणीचा गोळा सोबत असला तर त्याची चव आणखी जबरदस्त. थालीपीठ म्हटलं की, पीठ दळण्यापासून ते भाजण्यापर्यंतचा प्रवास.. पण अनेकदा झटपट पण सोप्या पद्धतीने खमंग थालीपीठ बनवायचं असेल तर? (Quick Indian breakfast)
नाचणीच्या पीठाचे थालीपीठ हे चवीला मस्त लागतात. आजच्या काळात जेव्हा सर्वत्र मैदा आणि फास्टफूडने पोटं बिघडवली आहेत. पण आपल्यालाही भाजणीच्या पिठाशिवाय थालीपीठ खायचे असेल तर ही सोपी रेसिपी ट्राय करुन पाहा.
बिना पाकातले रवा लाडू, सोपी ट्रिक- ना पाक चुकायची भीती, ना लाडू दगडासारखे कडक होण्याची - पाहा प्रमाण
साहित्य
नाचणीचे पीठ - १ कप
तांदळाचे पीठ - १/४ कप
मोठा चिरलेला कांदा - १
उकडलेले मक्याचे दाणे - १/२ कप
ओवा - १/२ चमचा
तीळ - १/२ चमचा
जिरे - १/२ चमचा
लाल मिरची पावडर - १/२ चमचा
आले-लसूण- मिरची पेस्ट
हिंग - १ चमचा
हळद - १ चमचा
मीठ - चवीनुसार
गरम पाणी - आवश्यकतेनुसार
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घ्या. त्यानंतर मक्याचे दाणे उकडून मॅश करा. आता आले-लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार करा. एका बाऊलमध्ये नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, कांदा, मॅश केलेले मक्याचे दाणे, कोथिंबीर, हळद, लाल मिरची पावडर जिरे, ओवा, तीळ, आले-लसूण पेस्ट,मीठ आणि वरुन गरम पाणी घालून हाताने मळून घ्या.
2. पीठ मळल्यानंतर त्याचा गोळा घेऊन सुती कपड्यावर किंवा पोळपाटावर भाकरी थापतो तसे थापा. हवं असल्यास त्याच्या मध्यभागी आपण होल करु शकतो. तवा गरम करुन मंद आचेवर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून थालीपीठ भाजून घ्या. सॉस किंवा दहीसोबत खा नाचणीचे खमंग थालीपीठ.