Lokmat Sakhi >Food > दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता चटकन होईल सिताफळाची बासुंदी, दाटसर-गोड बासुंदीचा आस्वाद घ्या गरमागरम पुरीसोबत

दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता चटकन होईल सिताफळाची बासुंदी, दाटसर-गोड बासुंदीचा आस्वाद घ्या गरमागरम पुरीसोबत

Maharashtrian sweets for festivals : Dussehra special sweets: Sitaphal Basundi recipe: Basundi for Dussehra: सध्या बाजारात सिताफळ पाहायला मिळत आहे. गोड-रसाळ सिताफळापासून बासुंदी कशी करायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2025 09:30 IST2025-09-29T09:30:00+5:302025-09-29T09:30:02+5:30

Maharashtrian sweets for festivals : Dussehra special sweets: Sitaphal Basundi recipe: Basundi for Dussehra: सध्या बाजारात सिताफळ पाहायला मिळत आहे. गोड-रसाळ सिताफळापासून बासुंदी कशी करायची पाहूया.

Dussehra special How to make sitaphal basundi quickly without boiling milk for hours Indian festival desserts Easy basundi at home | दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता चटकन होईल सिताफळाची बासुंदी, दाटसर-गोड बासुंदीचा आस्वाद घ्या गरमागरम पुरीसोबत

दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता चटकन होईल सिताफळाची बासुंदी, दाटसर-गोड बासुंदीचा आस्वाद घ्या गरमागरम पुरीसोबत

दसरा हा सण फक्त रावण दहनाचा नाही तर गोडधोड खाण्याचा उत्साह मानला जातो.(Maharashtrian sweets for festivals) या दिवशी घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. श्रीखंड-पुरी, बासुंदी, खीर, गुलाबजाम असे विविध गोड पदार्थ करतात.(Dussehra special sweets) पण यादिवशी प्रत्येकाच्या घरी कॉमन पदार्थ असतो तो श्रीखंड-पुरी किंवा बासुंदी पुरी. आजही अनेक घरांमध्ये सण-समारंभ असला की घरीच श्रीखंड किंवा बासुंदी केली जाते. (Sitaphal Basundi recipe) श्रीखंड तर लगेच बनत पण बासुंदी बनवण्यासाठी तासंतास गॅससमोर उभे राहावे लागते. इतकं सगळं करुनही ती काही दाटसर होत नाही. गॅसही वाया जातो आणि पदार्थही फसतो.(Basundi for Dussehra)
दूध आटवून बासुंदी करताना बराच वेळ वाया जातो. अनेकदा दूध ओतू जाते, तासंतास त्या दुधाकडे पाहण्याचा वैताग येतो. अनेकदा दूध जळण्याचा वास येतो ज्यामुळे पदार्थाची चव देखील बदलते. (Quick basundi without boiling milk) पण इतका सगळा घाट घालण्याऐवजी आपण काही सोप्या इन्स्टंट ट्रिकने सिताफळची बासुंदी तयार करु शकतो. सध्या बाजारात सिताफळ पाहायला मिळत आहे. गोड-रसाळ सिताफळापासून बासुंदी कशी करायची पाहूया. 

Suran Fries : पावसाळ्यात खा गरमगरम कुरकुरीत सुरणाचे फ्राइज – चवही मस्त आणि करायला अगदी सोपे

साहित्य 
दूध - २०० मिली 
दूध पावडर - २५० ग्रॅम
साखर - ५० ग्रॅम
सिताफळाचा गर - ४०० ग्रॅम
कापलेले ड्रायफ्रुट्स - ५० ग्रॅम
गुलाबाच्या पाकळ्या 

अण्णाकडे मिळतो तसा कुरकुरीत दालवडा घरीच करण्याची ट्रिक, रेसिपी सोपी आणि वड्याची चव म्हणजे अहाहा

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला पिकलेले सिताफळ घ्यावे लागेल. आता एका भांड्यात चाळणी ठेवून त्यावर सिताफळाचा गर घाला. चमच्याच्या मदतीने गर व्यवस्थित मॅश करा. ज्यामुळे त्याचा गर निघेल आणि बियासहज बाजूला होतील. 

2. त्यानंतर एका भांड्यात दूध घेऊन त्यात दूध पावडर घाला आणि रवीच्या मदतीने चांगले घोटून घ्या. आता गॅसवर कढई तापवून त्यात फेटलेले दूध घाला. दूध दाटसर झाल्यानंतर आणि उकळी आल्यानंतर त्यात साखर घाला. पुन्हा व्यवस्थित उकळवून घ्या. दूधाचा रंग बदलेल. 

3. गॅस बंद करुन कढई थंड होण्यास ठेवा. आता सर्व्हिंग बाऊलमध्ये दुधाचे तयार मिश्रण घाला. त्यात सिताफळाचा गर घालून चमच्याने मिक्स करा. वरुन ड्रायफ्रुट्स आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून सर्व्ह करा सिताफळाची बासुंदी 


Web Title : झटपट सीताफल बासुंदी रेसिपी: दशहरा के लिए एक त्वरित आनंद

Web Summary : दशहरा के लिए झटपट सीताफल बासुंदी बनाएं! मिल्क पाउडर का उपयोग करके इस आसान रेसिपी के साथ घंटों दूध उबालने से बचें। इस गाढ़े, मीठे व्यंजन को गरम पूरी के साथ आनंद लें।

Web Title : Instant Custard Apple Basundi Recipe: A Quick Dussehra Delight

Web Summary : Make custard apple basundi quickly for Dussehra! Skip hours of boiling milk with this easy recipe using milk powder. Enjoy this thickened, sweet dessert with hot puri.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.