Join us

रविवारी नाश्त्याला करा 'मलई ब्रेड विथ चाय', खास दुबई स्पेशल! घरच्याघरी करा दुबईची व्हायरल रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2025 18:02 IST

Dubai’s viral Malai Toast Recipe : Dubai Chai Toast Goes Viral, Trending Recipe Divides Foodies : Dubai Viral Malai Bread With Kadak Chai : How To Make Dubai Viral Malai Toast & Chai Recipe At Home : दुबईच्या स्ट्रीट फूडमधून उदयाला आलेली 'मलई ब्रेड विथ चाय' ही डिश आता भारतातही प्रचंड लोकप्रिय होत आहे.

रविवार म्हणजे सगळ्यांच्याच सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस असल्याने बराच वेळ असतो, या दिवशी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल बेत (Dubai’s viral Malai Toast Recipe) आखले जातात. सकाळच्या नाश्त्याची सुरुवात काहीतरी भारी, मस्त पदार्थ खाऊन करायची असेल तर एक असा स्पेशल पदार्थ (Dubai Chai Toast Goes Viral, Trending Recipe Divides Foodies) आहे जो आपण नाश्त्याला करू शकतो. सोशल मिडीयावर (Dubai Viral Malai Bread With Kadak Chai) सध्या एक अशीच अनोखी आणि तितकीच व्हायरल झालेली रेसिपी चर्चेत आहे, ती म्हणजे "दुबई मलई ब्रेड विथ चाय".  नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं, आणि ही रेसिपी पाहिल्यावर ती लगेच करून बघावीशी वाटते(How To Make Dubai Viral Malai Toast & Chai Recipe At Home).

साध्या ब्रेडपासून तयार केलेली ही मऊसर, क्रिमी, गोड, भरपूर मलईयुक्त आणि गरमागरम चहा सोबत चवीला एकदम भारी लागते. दुबईच्या स्ट्रीट फूडमधून उदयाला आलेली ही डिश आता भारतातही प्रचंड लोकप्रिय होत आहे. "दुबई मलई ब्रेड विथ चाय" ही डिश केवळ दिसायला आकर्षक नाही, तर चवीलाही तितकीच जादुई आहे. चवीला उत्तम असल्याने एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. सोशल मिडीयावर या रेसिपीने लाखोंच्या तोंडाला पाणी आणलंय, जर तुम्ही देखील काही वेगळं आणि इन्स्टंट झटपट पदार्थ तयार करायला शोधत असाल, तर ही डिश एकदा नक्की ट्राय करा.

साहित्य :- 

१. ब्रेड स्लाइस किंवा गोलाकार बन पाव - ४ ते ५ २. बटर - २ ते ३ टेबलस्पून ३. पिठीसाखर - चवीनुसार४. क्रिमी चीझ - २ टेबलस्पून 

ताकात मिसळा ७ सुपरफूड, पचन आणि पोषण मिळेल एकत्र, पोटाला मिळेल थंडावा...

कडू कारल्याची करा कुरकुरणीत चटणी, कारल्याची चटणी टिकते महिनाभर आणि चव भन्नाट-मुलांनाही आवडेल...

कृती :- 

१. सगळ्यात आधी आपल्या आवडीनुसार गोलाकार बन पाव किंवा ब्रेड स्लाइस घ्यावा. जर तुम्ही गोलाकार बन पाव घेतला असेल तर तो बरोबर मधोमध कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. २. आता एका मोठ्या बाऊलमध्ये बटर, क्रिमी चीझ आणि पिठीसाखर असे तिन्ही पदार्थ एकत्रित घेऊन ते चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 

कांदा-लसणाला हिरवे कोंब फुटले, टाकून द्यावे लागतात? १ उपाय-कांदा लसूण लवकर खराब होणार नाही...

३. बटर, क्रिमी चीझ आणि पिठीसाखर असे तिन्ही पदार्थ एकत्रित कालवून तयार झालेला क्रिमी, मऊसूत मिश्रण चमच्याने बरोबर ब्रेड स्लाइसला किंवा  गोलाकार बन पावला लावून घ्यावे. ४. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे करतो तास चहा तयार करून घ्यावा. ५. तयार बन पाव एका डिशमध्ये ठेवून त्यावर संपूर्ण पाव भिजेल इतकी चहा ओतून घ्यावी. जर आपल्याला अशा पद्धतीने खायचे नसेल तर आपण हा पाव चहात बुडवून देखील खाऊ शकता. 

अशा प्रकारे, रविवारचा सकाळचा स्पेशल नाश्ता 'दुबई मलई ब्रेड विथ चाय' खाण्यासाठी तयार आहे. बनच्या आत असणारे क्रिमी मिश्रण, चहाची गोडसर चव, चहात भिजून तोंडात विरघळणारा मस्त क्रिमी पाव इतका भारी नाश्ता म्हणजे रविवारचा बेत होईल झक्कास...  

खास टीप्स :- 

१. ही रेसिपी थंड किंवा गरम, दोन्ही प्रकारे छान लागते.

२. याची चव अधिक अजून उत्तम करायची असेल तर मलईत थोडंसं दूध, साखर आणि कंडेन्स्ड मिल्क देखील घालू शकता.

३. चहा थोडा मसालेदार आणि घट्ट असेल, तर मलई ब्रेडसोबत खाताना या दोन्ही पदार्थांचा अफलातून कॉम्बो तयार होतो.

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरलदुबई