भारतीय थाळी चटणी शिवाय अधुरीच आहे. आपल्याकडे ताटातील वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांना विशेष महत्वाचे स्थान आहे. ताटाच्या कोपऱ्यात वाढलेली चटणी संपूर्ण जेवणाची लज्जत वाढवते. अगदी साधे जेवणही यामुळे रुचकर, चविष्ट लागते. जेवणात कितीही पक्वान्नं असली, तरी जोपर्यंत ताटाच्या एका कोपऱ्यात एखादी झणझणीत चटणी येत नाही, तोपर्यंत जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. अनेकदा घरामध्ये भाजीला काय करावं सुचत नाही, किंवा कामाच्या गडबडीत एखादा झटपट तोंडी लावायचा पदार्थ हवा असतो, अशा वेळी 'कांद्याची सुकी चटणी' हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो(Dry Onion Chutney Recipe).
कांद्याचा गोडवा आणि लाल तिखटाचा झणझणीतपणा यांचा हा असा संगम आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. विशेष म्हणजे, ही चटणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते आणि अवघ्या १० मिनिटांत ही चटणी तयार होते. प्रवासासाठी असो किंवा ऑफिसच्या डब्यासाठी, ही चटणी टिकायलाही छान आणि चवीलाही अप्रतिम लागते. कांद्याची सुकी चटणी करण्याची अगदी सोपी आणि पारंपारिक रेसिपी... घरच्या घरी बनवलेली चविष्ट आणि झणझणीत चटणी म्हटलं की जेवणाची लज्जतच वाढते. विशेषतः साध्या भाकरी, पोळी किंवा भातासोबत खायला काहीतरी चटकदार हवं असेल, तर कांद्याची सुकी चटणी हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. कमी साहित्य, झटपट बनणारी आणि दीर्घकाळ टिकणारी ही चटणी (kandyachi suki chutney) गावरान चवीची खास आठवण करून देते.
साहित्य :-
१. धणे - १ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. मेथी दाणे - १/२ टेबलस्पून ४. चणा डाळ - १/२ टेबलस्पून ५. पांढरी उडीद डाळ - १/२ १/२ टेबलस्पून ६. हिंग - चिमूटभर७. चिंच - १ ते २ छोटे तुकडे८. तेल - २ ते ३ कप ९. कांदा - २ ते ३ कप (उभा चिरलेला) १०. शेंगदाणे - १ कप ११. कडीपत्ता - २ कप १२. लसूण पाकळ्या - १० ते १५ पाकळ्या१३. सुक्या लाल मिरच्या - ४ ते ६ मिरच्या १४. काश्मिरी लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून १५. मीठ - चवीनुसार
कापसापेक्षाही मऊ - लुसलुशीत दहीवडे! पिठात कालवा १ पदार्थ - पाहुणेही विचारतील रेसिपी...
आई - आजीच्या हातचं कैरीचे पन्हे कसे मस्त लागते, पाहा पारंपरिक चवीसाठी ७ सिक्रेट टिप्स...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये धणे, जिरे, मेथी दाणे, चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, चिमूटभर हिंग, चिंच घालून सगळे जिन्नस व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यावेत. भाजलेलं मिश्रण एका डिशमध्ये काढून ते थोडं थंड होऊ द्यावं. २. कढईत तेल ओतून त्यात उभा चिरलेला कांदा खरपूस रंग येईपर्यंत चांगला तळून घ्यावा. मग याच तेलात शेंगदाणे, कडीपत्ता, लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्या असे सगळे जिन्नस एक - एक करून हलकेच तळून घ्यावेत. हे सगळे जिन्नस तळून एका डिशमध्ये काढून थोडे गार होऊ द्यावेत.
३. आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले धणे, जिरे, मेथी दाणे, चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, चिमूटभर हिंग, चिंच यांचं एकत्रित मिश्रण घालावं. त्यात चवीनुसार मीठ, काश्मिरी लाल मिरची पावडर आणि तळून घेतलेले शेंगदाणे, कांदा, कडीपत्ता, लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्यांच अर्धे मिश्रण घालावं. मिक्सर फिरवून चटणी व्यवस्थित वाटून घ्यावी. चटणी थोडी जाडी भरडी वाटून घ्यावी. ४. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली चटणी एका बाऊलमध्ये काढून त्यात तळून घेतलेले शेंगदाणे, कांदा, कडीपत्ता, लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्यांच अर्ध उरलेलं मिश्रण घालावं. चटणी चमच्याने कालवून एकजीव करावी.
तयार कांद्याची सुकी चटणी एका हवाबंद बरणीत भरून स्टोअर करून ठेवावी. ही कांद्याची सुकी चटणी आपण चपाती, भाकरी किंवा अगदी साध्या वरण - भातासोबतही चवीला अप्रतिमच लागते.
Web Summary : Indian cuisine is incomplete without chutneys. This dry onion chutney recipe offers a quick, flavorful alternative to vegetables. Ready in 10 minutes with readily available ingredients, it's perfect with roti, bhakri, or rice.
Web Summary : भारतीय थाली चटनी के बिना अधूरी है। यह सूखी प्याज की चटनी झटपट और स्वादिष्ट विकल्प है। 10 मिनट में आसानी से उपलब्ध सामग्री के साथ तैयार, यह रोटी, भाकरी या चावल के साथ परोसने के लिए एकदम सही है।