अनेक घरगुती उपाय आपल्याला माहिती नसतात. किंवा माहिती असले तरी त्यांचा वापर आपण नियमाने करत नाही. (dry ginger is the best medicine and a great remedy for headache )घरगुती उपायांमध्ये विविध पदार्थांचा समावेश असतो. जवळपास अनेक समस्यांवर घरगुती उपाय असतात. एकाच पदार्थात विविध प्रकारचे गुणधर्म असतात. आलं फार पौष्टिक आहे.
आपल्या रोजच्या आहारात आलं असावे लागते. चहात टाकायला आलं आपण वापरतो. तसेच विविध पदार्थ करताना आलं वापरतो. (dry ginger is the best medicine and a great remedy for headache )आलं औषध म्हणूनही वापरले जाते. त्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. आलं तर वापरले जाते, मात्र सुंठ वापरता का? आलं सुकवून त्याची सुंठ केली जाते. सुंठ पूड औषधी असते. विविध प्रकारे वापरता येते.
ताजे आले सुकवून त्याची पूड केली जाते. पांढऱ्या रंगाच्या या पूडला सुंठ म्हणतात. चवीला जरा तिखट असते आणि वास फार छान येतो. खाद्यपदार्थ करताना सुंठ वापरली जाते. इतरही अनेक प्रकारे वापरता येते. ही पूड एकदा केली की वर्षभर टिकते. अजिबात खराब होत नाही. सुंठीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. दाहविरोधक गुणधर्मही असतात. बीटा कॅरोटीन असते. कैप्सेसिन असते तसेच कर्क्यूमिनसारखे घटक असतात.
१. डोकेदुखीवर अगदी रामबाण उपाय म्हणजे सुंठीचा लेप. कपाळाला सुंठ उगाळून लावल्याने डोकेदुखी थांबते. तसेच सुंठ गोळी खाल्यानेही फायदा होतो.
२. वजन कमी करण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. आहारामध्ये सुंठीचा समावेश करून घ्या. सुंठ पाणी तसेच सुंठीचा काढा पिणे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
३. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुंठ खाणे फायद्याचे ठरते. रोग पसरवणारे जिवाणू शरीराबाहेरच राहावेत यासाठी सुंठीचा वापर करणे फायद्याचे ठरते.
४. सर्दी, खोकला, ताप असे वरचेवर होणारे आजार सुंठीमुळे कमी होतात. सुंठीचे पाणी प्यायल्याचा फायदा होतोच, मात्र सुंठीचा लेप उगाळून लावणे अगदी मस्त उपाय आहे.
५. पचनसंस्थेचे काम छान सुरळीत व्हावे यासाठी सुंठ औषधी आहे. त्यामुळे आहारामध्ये सुंठ असावीच.
६. हातापायाला सुज येते का? मग सुंठीचा लेप लावून बघा. नक्की उपयुक्त ठरेल.