Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अश्विनी काळसेकरांच्या घरी केलं जातं शेवग्याच्या शेंगांचं पारंपरिक लोणचं! जेवणाची चव वाढवणारी रेसिपी...

अश्विनी काळसेकरांच्या घरी केलं जातं शेवग्याच्या शेंगांचं पारंपरिक लोणचं! जेवणाची चव वाढवणारी रेसिपी...

Ashwini Kalsekar favorite homemade Drumstick pickle recipe : Drumstick Pickle Recipe : shevgyachya shengache lonche recipe : बॉलिवूड अभिनेत्री अश्विनी काळसेकर सांगतात झणझणीत, चमचमीत शेवग्याच्या शेंगांच्या लोणच्याची स्पेशल रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2026 14:18 IST2026-02-23T14:03:56+5:302026-02-23T14:18:19+5:30

Ashwini Kalsekar favorite homemade Drumstick pickle recipe : Drumstick Pickle Recipe : shevgyachya shengache lonche recipe : बॉलिवूड अभिनेत्री अश्विनी काळसेकर सांगतात झणझणीत, चमचमीत शेवग्याच्या शेंगांच्या लोणच्याची स्पेशल रेसिपी...

Drumstick pickle recipe Ashwini Kalsekar favorite homemade Drumstick pickle pickle shevgyachya shengache lonche recipe | अश्विनी काळसेकरांच्या घरी केलं जातं शेवग्याच्या शेंगांचं पारंपरिक लोणचं! जेवणाची चव वाढवणारी रेसिपी...

अश्विनी काळसेकरांच्या घरी केलं जातं शेवग्याच्या शेंगांचं पारंपरिक लोणचं! जेवणाची चव वाढवणारी रेसिपी...

बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत राहूनही आपल्या संस्कृतीची आणि मातीची ओढ जपणारी मराठमोळी अभिनेत्री 'अश्विनी काळसेकर', जिच्या अभिनयाचे चाहते फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आहेत. घरगुती चव, पारंपरिक पाककृती आणि आजी - आईच्या हातचा खास स्वाद यांची आठवण करून देणारे लोणचे आजही महाराष्ट्रभरात प्रत्येक जेवणाची शान मानले जाते. आजवर आपण आंब्याच, कैरीचं किंवा गाजर, करवंदाच असे अनेक चविष्ट लोणच्याचे प्रकार ऐकले असतील आणि चाखूनही पाहिले असेल पण कधी शेवगाच्या शेंगांच लोणचं ऐकलं आहे का? शेवग्याच्या शेंगा (Drumsticks) आपल्याकडे भाज्यांमध्ये किंवा सांबारमध्ये वापरल्या जातात. पण या शेंगांचे लोणचे हा प्रकार ऐकायला थोडा वेगळा असला, तरी चवीला मात्र तो अप्रतिम असतो. नुकतेच अश्विनी काळसेकर यांनी सांगितले की, त्यांच्या मोठ्या जाऊबाई हे लोणचं खूपच भारी आणि टेस्टी करतात इतकंच नाही तर घरात हे लोणचे पिढ्यानपिढ्या बनवले जाते. हे लोणचे फक्त चवीलाच टेस्टी नसते, तर ते एक बेस्ट 'सुपरफूड' मानले जाते(Ashwini Kalsekar favorite homemade Drumstick pickle recipe).

भारतीय स्वयंपाकघरात लोणच्याला विशेष स्थान आहे. जेवणात साधी भाजी-पोळी असली तरी बाजूला चवदार लोणचे असेल तर जेवणाची मजा दुप्पट होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर पोषकतत्व (Drumstick Pickle Recipe) असल्यामुळे त्यापासून तयार केलेले लोणचे आरोग्यासाठीही लाभदायक मानले जाते. अश्विनी काळसेकर (shevgyachya shengache lonche recipe) यांनी  सांगितल्याप्रमाणे, हे लोणचे त्यांच्या घरी खास पारंपरिक पद्धतीने तयार केले जाते, पाहूयात याची खास रेसिपी... 

साहित्य :- 

१. धणे - १ टेबलस्पून
२. जिरे - १ टेबलस्पून
३. बडीशेप - १ टेबलस्पून
४. मोहरी - १ टेबलस्पून
५. लाल सुक्या मिरच्या - ३ ते ४ 
६. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
७. हळद - १ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार 
९. हिंग - चिमुटभर
१०. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
११. लिंबाचा रस - २ टेबलस्पून
१२. पाणी - १ ग्लास 

मूग डाळीच्या भजीपेक्षाही भारी! खमंग - कुरकुरीत 'मसाला मूग वडा' - चव अप्रतिम, होईल मिनिटभरात फस्त... 


कोकणातल्या पारंपरिक चवीच्या सांडगी मिरचीची पाहा रेसिपी, वर्षभर टिकेल-ना बुरशी येते ना खमंगपणा जातो...

कृती :- 

१. अभिनेत्रीने अश्विनी काळसेकर यांनी शेअर केलेल्या पद्धतीनुसार, सर्वात आधी शेवग्याच्या शेंगाच्या वरची सालं सुरीच्या मदतीने काढून घ्यावी. मग भाजीसाठी करतो तसेच या शेंगांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्यात. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात या सोललेल्या शेंगा घालून त्या २ ते ३ मिनिटे हलकेच वाफवून घ्याव्यात, पण त्या जास्त मऊ होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यानंतर त्या शेंगा कापडावर पसरवून पूर्णपणे कोरड्या कराव्यात (ओलावा राहिल्यास लोणचे खराब होऊ शकते).

२. एका गरम पॅनमध्ये धणे, जिरे, बडीशेप, मोहरी, लाल सुक्या मिरच्या असे सगळे जिन्नस एकत्रित करून ३ ते ५ मिनिटे मध्यम आचेवर मसाल्यांचा खमंग सुगंध येईपर्यंत परतवून घ्यावेत. मग हे मिश्रण एका डिशमध्ये काढून ते व्यवस्थित गार होऊ द्यावेत. गार झाल्यावर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून त्याची जाडसर भरड होईल असे वाटून घ्यावे. 

गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी ! भाकरी सोबत होईल फक्कड बेत - आठवेल आजीच्या हातची चव...

३. एका डिशमध्ये उकडवून घेतलेल्या शेंगा नीट पसरवून ठेवाव्यात. मग त्यावर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला घालावा. त्यानंतर त्यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, चवीनुसार मीठ, हिंग घालावे. दुसऱ्या एका पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यावे, या गरम तेलात मोहरी घालून ती नीट तडतडू द्यावी. असे खमंग व कडकडीत गरम तेल डिशमधील शेंगावर ओतावे. मग चमच्याने सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे. लोणचं थोडं थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर कराव.

चमचमीत, चटपटीत तरी पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागणार शेवग्याच्या शेंगांच लोणचं खाण्यासाठी तयार आहे. हे लोणचे लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे शेवग्याचे गुणधर्म. शेवगा हा कॅल्शिअम, लोह आणि जीवनसत्त्वांचा खजिना आहे. हे लोणचे स्वच्छ काचेच्या बरणीत भरून २ ते ३ दिवस उन्हात ठेवल्यास त्याची चव अधिक खुलते. शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे हे लोणचे चवीसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. गरम भाकरी, पोळी किंवा साध्या वरण - भातासोबत हे लोणचे खाल्ल्यास जेवणाची मजा अनेकपटीने वाढते.

Web Title : अश्विनी काळसेकर की पारंपरिक सहजन की अचार रेसिपी, भोजन का स्वाद बढ़ाती है

Web Summary : अभिनेत्री अश्विनी कालसेकर ने अपने परिवार की पारंपरिक सहजन के अचार की रेसिपी साझा की, जो स्वादिष्ट और स्वस्थ है। यह अचार, साधारण मसालों से बना, किसी भी भोजन को बढ़ाता है और कैल्शियम, आयरन और एंटीऑक्सीडेंट से भरपूर है। एक पारंपरिक पारिवारिक रेसिपी जो पीढ़ी दर पीढ़ी चली आ रही है।

Web Title : Ashwini Kalsekar's traditional drumstick pickle recipe enhances meal flavors.

Web Summary : Actress Ashwini Kalsekar shares her family's traditional drumstick pickle recipe, a flavorful and healthy superfood. This pickle, made with simple spices, enhances any meal and is packed with calcium, iron, and antioxidants. A traditional family recipe passed down through generations.