Lokmat Sakhi >Food > शेवग्याच्या पानांचं करा कुरकुरीत कटलेट, क्रिस्पी व टेस्टी नाश्ता- ठिसूळ हाडं होतील मजबूत

शेवग्याच्या पानांचं करा कुरकुरीत कटलेट, क्रिस्पी व टेस्टी नाश्ता- ठिसूळ हाडं होतील मजबूत

crispy moringa cutlet: benefits of moringa leaves: evening snack with moringa: कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 10:15 IST2025-07-19T10:08:49+5:302025-07-19T10:15:45+5:30

crispy moringa cutlet: benefits of moringa leaves: evening snack with moringa: कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

drumstick leaves cutlet recipe morning breakfast idea healthy snacks for strong bones | शेवग्याच्या पानांचं करा कुरकुरीत कटलेट, क्रिस्पी व टेस्टी नाश्ता- ठिसूळ हाडं होतील मजबूत

शेवग्याच्या पानांचं करा कुरकुरीत कटलेट, क्रिस्पी व टेस्टी नाश्ता- ठिसूळ हाडं होतील मजबूत

नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न रोजचाच.(Morning Breakfast) सकाळचा नाश्ता हा पौष्टिक आणि पोट भरणारा असावा असं नेहमीच सांगितलं जातं. पण रोज तेच तेच पदार्थ खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. नवीन काय बनवायचे हा देखील प्रश्न असतो.(crispy moringa cutlet) आरोग्यासाठी शेवग्याची शेंगच नाही तर तिच्या पानांचे देखील अनेक फायदे आहे. याची भाजी, डाळ किंवा सूप बनवून प्यायले जाते. पण कधी शेवग्याच्या पानांचे कटलेट खाल्ले आहे का? (benefits of moringa leaves)
शेवग्याच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.(evening snack with moringa) या पानांमध्ये व्हिटॅमिन्स ब, सी, ए आणि लोह, प्रथिने भरपूर प्रमाणात असते. ज्याचे सेवन केल्याने भरपूर पोषकतत्व मिळते.(drumstick leaves) जर आपली मुले देखील शेंगा खात नसतील तर शेवग्याच्या पानांचे कटलेट बनवून त्यांना खाऊ घाला. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होईल. कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

डोसा तव्याला चिकटतो- परफेक्ट जमत नाही? सोपी ट्रिक- विकतसारखा जाळीदार डोसा बनेल काही मिनिटांत

साहित्य 

उकडलेले बटाटे- २ 
चिरलेली शेवग्याची पाने - १ कप 
बारीक चिरलेला कांदा - १ 
हळद - १/४ चमचा
लाल मिरची पावडर - १/२ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
चाट मसाला -१/४ चमचा
काळीमिरी पावडर - १/४ चमचा
तांदळाचे पीठ - १ चमचा 
रवा - आवश्यकतेनुसार 
तूप - २ चमचे
मीठ 


कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करुन घ्या. नंतर त्यात चिरलेली  शेवग्याची पाने, कांदा, मीठ, हळद, गरम मसाला, चाट मसाला, काळीमिरी पावडर आणि तांदळाचे पीठ घाला. 

2. नंतर चमच्याने सारण व्यवस्थित एकजीव करा. हाताने पीठ वळवून त्याचा गोळा तयार करा. आता रव्यामध्ये हा गोळा ठेवून कटलेटचा आकार द्या. दोन्ही बाजूने व्यवस्थित रवा लावून घ्या. 

3. आता पॅन गरम करुन त्यावर तेल पसरवा. मंद आचेवर गॅस ठेवून त्यावर कटलेट ठेवा. वरुन तेल पसरवून दोन्ही बाजूने कटलेट फ्राय करुन घ्या. सॉससोबत खा गरमागरम शेवग्याच्या पानांचे कटलेट. 
 

Web Title: drumstick leaves cutlet recipe morning breakfast idea healthy snacks for strong bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.