बारमाही पिकणाऱ्या अळूच्या पानांना पावसाळ्यात विशेष मागणी असते.(Aloo Vadi throat irritation) महाराष्ट्रातील सगळ्याचा आवडीचा पदार्थ अळूवडी.(Aloo Vadi allergy symptoms) सणसमारंभ असो किंवा काही खास प्रसंग अळूवडी बनवली जाते. महाराष्ट्रातील लग्नसमारंभात अळूच्या पानांची भाजी केली जाते.(Cooking tips for Aloo Vadi) बेसनाच्या पीठाला अळूच्या पानांवर थापून त्याची खमंग कुरकुरीत वड्या तयार केल्या जातात. अळूपासून अनेक पदार्थ केले जातात.(Traditional Aloo Vadi preparation) अळूवडी, अळूचं फदफदं, अळूची भाजी आपण खाल्ली असेलच. अनेकदा अळूवडी करताना आपल्या घशात खवखव होते किंवा घशात काटे टोचल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपले संपूर्ण पदार्थ खराब होतात. (Which colocasia leaves are safe for Patra)
अळूची पाने ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ही पाने कफ आणि पित्तनाशकावर चांगली मानली जातात. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई चा चांगला स्त्रोत आहे. परंतु, यामध्ये कॅल्शियम ऑक्सझलेट असते ज्यामुळे आपल्याला घशात खवखवण्याची समस्या जाणवू लागते. अळूवडी बनवताना घशात खाज सुटू नये म्हणून पानांची निवड कशी करावी? कोणत्या प्रकारची पाने विकत घ्यावी? अळूवडी बनवताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात पाहूया.
अळूच्या पानांमध्ये दोन प्रकार असतात. एक हिरव्या देठांची पाने आणि दुसरी काळ्या देठांची पाने. हिरव्या देठाच्या पानांची अळूवडी बनवली की, घसा खवखवतो. हिरव्या देठांची अळूची पाने असतील तर त्याची भाजी किंवा फदफदं बनवू शकतो. यामध्ये दही, चिंच, आमसूल किंवा कोकम घाला.
काळ्या देठाच्या अळूची पानं कमी प्रमाणात खाजरी असतात. याची आपण अळूवडी बनवू शकतो. वड्या तयार करताना बेसनात गूळ, चिंच घालायला विसरु नका. यामुळे घशाला खाज लागत नाही तसेच ती अधिक चविष्ट, कुरकुरीत आणि खमंग होते.