lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात गारेगार सोडा पिता? पण हा सोडा मुळचा कुठला? तयार कसा झाला?

उन्हाळ्यात गारेगार सोडा पिता? पण हा सोडा मुळचा कुठला? तयार कसा झाला?

उन्हाळ्यात शितपेयं पितोच, त्यातला सोडा किती आवडता? त्याची ही गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2024 08:00 AM2024-03-17T08:00:00+5:302024-03-17T08:00:02+5:30

उन्हाळ्यात शितपेयं पितोच, त्यातला सोडा किती आवडता? त्याची ही गोष्ट.

Do you drink soda in the summer? But where does this soda come from? How was it prepared? | उन्हाळ्यात गारेगार सोडा पिता? पण हा सोडा मुळचा कुठला? तयार कसा झाला?

उन्हाळ्यात गारेगार सोडा पिता? पण हा सोडा मुळचा कुठला? तयार कसा झाला?

Highlightsभारतातल्या उच्चवर्गीय तरुणाईच्या हातात फॅशन म्हणून शीतपेयांची बाटली मिरवू लागली.

- मेघना सामंत

उन्हाळा सुरु झाला की लगेच वाटतं काहीतरी गार प्यावं. थंडगार. अनेकजणी कोल्ड्रिंक पितात. सरबतं पितात, मॉकटेल्स पितात. घरच्याघरीही सरबतात सोडा घालून अनेक पदार्थ करतात. रात्री सोड्याच्या गाडीवर गर्दी उसळते. पण कधी प्रश्न पडला की हा सोडा सर्वात आधी कुणी बनवला असेल?
आजवरचे काही अभ्यास म्हणतात की कोणेएकेकाळी झऱ्यांच्या पाण्याला युरोपात औषधी महत्त्व होतं. चुनखडी विरघळल्यामुळे हे पाणी चवदार आणि आल्हाददायक असायचं. सतराव्या शतकात साधं लिंबूपाणी पॅरिसमध्ये चौकाचौकांत ग्लासात भरून विकत मिळत असे. पण, डोंगरी झऱ्याच्या पाण्याची ती विशिष्ट टवटवी त्यात नव्हती. १७६७ मध्ये जोसेफ प्रिस्टले या ब्रिटिश डॉक्टरने पाण्यात कार्बनडायॉक्साइड विरघळवण्याची पद्धत शोधली आणि ‘सोडा’ या विलक्षण पेयाचा जन्म झाला. झऱ्यासारखं भासणारं, किंचित क्षारमिश्रित खळखळतं पाणी.

(Image :google)

पुढे थोड्याच वर्षांत हे पाणी वायूसकट बाटलीबंद करण्याचं तंत्र अवगत झालं. तेव्हापासून ते जवळ बाळगण्याची, कुठेही नेण्याची चांगलीच सोय झाली. आणखी काही वर्षांतच या पाण्यात लिंबूरस आणि आल्याचा स्वाद आला. मधाचीही भर पडली. हे जिंजर-लेमन. आद्य सॉफ्टड्रिंक. याची लोकप्रियतादेखील औषधी गुणधर्मामुळे. तहान मिटायची आणि बारीकसारीक दुखणी दूर व्हायची. कार्बनयुक्त जिंजरेल अथवा लेमोनेड अपचनावर गुणकारी असल्याचा समज होता, अजूनही आहे. पश्चिमी देशांत सोडायुक्त पेय जवळजवळ रोजच्या आहाराचा भाग बनलं. त्याची नशा येत नाही, मुलंही ते पिऊ शकत, त्यामुळे त्याला एक प्रकारचा घरगुती स्पर्श होता.

ब्रिटिशांनी ते भारतात आणण्याआधीची इथली साधीसोपी पेयं म्हणजे प्राचीन काळापासूनचं पानकम् उर्फ कैरीचं पन्हं, शहाळ्याचं पाणी, आंब्याचा किंवा स्थानिक मोसमी फळांचा ताजा रस, नुसतं गूळपाणी, लिंबाचं सरबत, ताक, लस्सी, पीयूष, मठ्ठा अशी नैसर्गिक. ती अर्थातच सोडायुक्त नसत. भारतीयांना गेल्या सत्तरऐंशी वर्षांपूर्वी सोड्याची सवय लागली ती मुख्यतः जाहिरात तंत्रामुळे. अपचनावर हमखास उपाय म्हणून फ्रूट सॉल्ट घातलेलं पाणी नाहीतर सरळ सोड्याची बाटली उपयोगात आणली जात असे. जुन्या पिढीतल्यांना ‘गोटी सोडा’ नावाचा प्रकार नक्की आठवत असेल.
 भारतातल्या उच्चवर्गीय तरुणाईच्या हातात फॅशन म्हणून शीतपेयांची बाटली मिरवू लागली. आणि पुढे तर जाहिरातीमुळे अनेकजण सर्रास सोडा असलेली कोल्डड्रिंक पिऊ लागले.

(लेखिका खाद्यशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Do you drink soda in the summer? But where does this soda come from? How was it prepared?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.