Join us

Diwali special : चिवडा कोणताही असो मसाला एकच! घरच्याघरी तयार करा सिक्रेट चिवडा मसाला, विकतचा आणायची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2025 17:23 IST

Homemade chivda masala: Secret chivda spice mix: Chivda recipe at home: आपल्यालाही घरच्या घरी चिवडा मसाला करायचा असेल तर सोपी रेसिपी पाहा.

चिवडा हा आपल्या घरच्या पारंपरिक स्नॅक्समधील सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. दिवाळीच्या फराळात असो किंवा रोज चहासोबत खाण्यासाठी चिवडा हा प्रत्येकाच्या घरी आवडीने तयार केला जातो.(Diwali special) चिवडा हा बनवायला सोपा आणि झटपट होणारा पदार्थ.(Homemade chivda masala) पण चिवडा बनवण्यासाठी आपण बाजारातला विकतचा मसाला वापरतो.(Secret chivda spice mix) यात जास्त तेल, मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. याची चव जरी छान लागत असली तरी आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (Chivda recipe at home)घरच्या घरी तयार केलेला चिवडा मसाला फक्त चव वाढवतो असं नाही तर आपल्या पदार्थाला आणखी टेस्टी बनवतो.(Homemade snack masala)दिवाळीत आपण मक्याचा, पोह्याचा किंवा कुरमुऱ्यांचा चिवडा बनवतो खरं. पण त्याची चव काही शेवटपर्यंत टिकून राहत नाही.(Traditional Maharashtrian chivda) जर आपल्यालाही घरच्या घरी चिवडा मसाला करायचा असेल तर सोपी रेसिपी पाहा. ज्यामुळे महिनाभर आपला चिवडा फ्रेश राहिल आणि चवही बदलणार नाही. (Indian snack masala recipe for crunchy chivda)

Diwali Faral : शंकरपाळे दगडासारखे कडक होतात? शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना ‘या’ चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील

साहित्य 

आमचूर पावडर - २ चमचे चाट मसाला - १ चमचा काळे मीठ - १ चमचा मीठ - १ चमचा साखर - ३ चमचे बडीशेप - १ चमचा हळद पावडर - १ चमचा काळी मिरी- १ चमचा लाल मिरची पावडर - २ चमचे लवंगी मिरची पावडर - १ चमचा गरम मसाला पावडर - १ चमचा धने - १ चमचा 

कृती 

१. सगळ्यात आधी धने तव्यावर हलके गरम करा, भाजून नका. त्यानंतर बडीशेपसुद्धा हलकी गरम करा. आता मिक्सरच्या भांड्यात धने, बडीशेप, काळी मिरी आणि काळे मीठ घाला. याची बारीक पावडर तयार करा. 

२. यामध्ये आता साखर, चाट मसाला आणि उरलेले सर्व मसाले घाला. मिक्समध्ये व्यवस्थित फिरवून घ्या. हवं असल्यास आपण यात मसाल्याचे प्रमाण वाढवू शकतो. मसाला तयार करण्यापूर्वी साहित्य हलके गरम करा किंवा उन्हात गरम करा. ज्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो आणि चिवडा खराब होण्याची शक्यता कमी असते. यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न घातल्यामुळे याची चवही अगदी तशीच राहते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Special: Homemade Chivda Masala Recipe for Long-Lasting Flavor

Web Summary : Make preservative-free chivda masala at home for Diwali. This recipe ensures a fresh, flavorful snack that lasts. Avoid store-bought versions for better health.
टॅग्स :दिवाळी २०२५अन्नपाककृती