Join us

लक्ष्मी पूजनाला साळीच्या लाह्या नैवेद्यासाठी का ठेवतात? पाहा, अमृतासमान लाह्या खाण्याचे ५ फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 21:31 IST

Diwali laxmi pujan special : साळीच्या लाह्या फक्त नैवेद्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी फार महत्वाच्या असतात.

दिवाळीला (Diwali) सुरूवात झाली असून सर्वांच्याच घरी उत्साहाचे वातावरण आहे. उद्या दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूनाच्या (Laxmi Pujan) दिवशी प्रत्येक घरामध्ये लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यावेळी साळीच्या साह्या आणि बत्ताश्यांचा नैवेद्य दाखवला जातो. (Laxmi Pujan Naivedya Benefits) साळीच्या लाह्या फक्त नैवेद्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी फार महत्वाच्या असतात. आजारी व्यक्तीला साळीच्या लाह्यांचे पाणी दिल्यानं उर्जा मिळते. साळीच्या लाह्या खाण्याचे फायदे समजून घेऊ. (laxmi pujan Naivedya Salichay Lahya Benefits)

१) थंडीच्या दिवसांत साळीच्या लाह्या खाल्ल्यानं कफ कमी होण्यास मदत होते आणि आराम मिळतो. लहान मुलांनही अनेकदा साळीच्या लाह्या देण्याचा सल्ला  दिला जातो. 

२) पचायला हलक्या असणाऱ्या साळीच्या लाह्या यातील उपयुक्त घटकांमुळे शरीच्या पचनक्रियेसाठी  उत्तम मानले जातात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तुम्ही या लाह्यांचा आहारात समावेश करू शकता. 

दिवाळी : कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र जास्त शोभून दिसतं? पाहा, नेमकं कधी काय घालावं..

३) पिसीओएस आणि पिसीओडीचा त्रास असल्यास लाह्या खाणं फायदेशीर ठरतं. मासिक पाळीत महिलांना पोटदुखी, अंगदुखी, कंबरदुखी अशा समस्या उद्भवत असतील तर नियमित साळीच्या  लाह्या खायला हव्यात.

४) लाह्यांमध्ये कमी कॅलरीज असतात.  ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही लाह्यांचे सेवन करा. ज्यामुळे भूक कमी लागते आणि अन्नही कमी  खाल्ले जाते.

कोणत्या साडीवर कोणत्या बांगड्या छान दिसतात? ८ टिप्स, बांगड्या निवडा परफेक्ट- हात दिसतील सुंदर

५) लाह्या खाल्ल्यानं हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य चांगले राहते. लाह्या खाल्ल्यानं रक्तदाबही नियंत्रणात  राहतो. तब्येत चांगली ठेवण्यासाठी लाह्या खाणं उत्तम ठरते.  याशिवाय लाह्यांमद्ये मुबलक प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स असतात  ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी लाह्या खाणं उत्तम ठरतं. लाह्यांची पावडर दुधात मिसळून प्यायल्यानं चेहऱ्यावरचे डाग, पिंप्लस, सुरकुत्यांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

टॅग्स :दिवाळी 2024अन्न