दिवाळी म्हटलं की घराघरात फराळाचा सुगंध दरवळतो. चकल्या, शंकरपाळे, करंज्या, लाडू आणि यांसारखे अजून कितीतरी पदार्थ आपल्या ताटात पाहायला मिळतात.(Diwali Faral) पण या गोडधोड पदार्थांमध्ये असा एक मसालेदार, झणझणीत पदार्थ असतो जो दिवाळीला आवडीने केला जातो.(Lati Vadi recipe) पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक लाटी वडी.(Spicy Diwali farsan) नाव जरी साधं असलं तरी चव मात्र याची अप्रतिम लागते. या वडीत असणारे खमंग, मसालेदार पदार्थ त्याची चव अधिक वाढवतात.(Traditional Indian snacks) पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात लाटी वडी दिवाळीच्या फराळात कायमच बनवली जाते. या वडीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती ना फार मऊ असते ना फार कडक.(Lati Vadi cooking tips) अगदी कुरकुरीत, खमंग लागते. ही लाटी वडी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Marathi snack recipes)
साहित्य-
गव्हाचे पीठ- १ कप
बेसन- १ कप
लाल मिरची पावडर- १ छोटा चमचा
हळद- १/२ चमचा
ओवा- १/२ चमचा
मीठ- चवीप्रमाणे
तेलाचे मोहन- २-३ चमचे
सारणाचे साहित्य-
कारळे- २ मोठे चमचे
तीळ- २ मोठे चमचे
खसखस- १ मोठा चमचा
सुक्या खोबऱ्याचा कीस- १/२ कप
लसूण- १५-२० पाकळ्या
कोथिंबीर- १/४ कप बारीक चिरून
जिरे- १ चमचा
मीठ- चवीप्रमाणे
कांदा लसूण मसाला- २ चमचे
लाल मिरची पावडर- १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर कढई गरम करुन त्यात कारळे भाजून घ्यावे लागतील. त्यानंतर पांढरे तीळ, खसखस, सुके खोबरे वेगवेगळ्या पद्धतीने कोरडे भाजून घ्या. आता भाजलेले पांढरे तीळ, खसखस आणि कराळे खलबत्यामध्ये घ्या. त्यात वरुन जिरे, लसूण घालून बारीक करा. आता ताटात भाजलेल्या खोबऱ्याचा किस घालून हाताने मॅश करा.
2. त्यानंतर त्यात बारीक केलेला मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, कोथिंबीर, मीठ आणि तेल घाला. हाताने सर्व साहित्य एकत्र करा.
3. एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, ओवा आणि तेलाचे मोहन घालून चमच्याने एकजीव करा. नंतर हाताने सर्व पीठ चोळा. हळूहळू पाणी घालून त्याचे कणिक मळून घ्या. वरुन तेल लावून ५ मिनिटे कणिक सेट होण्यास ठेवा.
4. आता पीठाचा गोळा घेऊन त्याची चपाती लाटा. त्यावर थोडेसे तेल पसरवून घ्या. त्यावर तयार मसाल्याचे सारण पसरवा. हळूहळू चपातीला एका बाजूने दुमडून हलका चपटा रोल तयार करा. त्यानंतर एकसारख्या वड्या कापून घ्या.
5. तयार वड्या १० ते १५ मिनिटांसाठी वाफवून घ्या. थोड्या थंड झाल्यानंतर तेल गरम करुन मंद आचेवर वड्या तळून घ्या. तयार होतील खमंग-खुसखुशीत लाटी वडी.