दिवाळी म्हटलं की आनंदाचा, उत्साहाचा आणि गोडव्याचा सण.(rava ladoo recipe) या काळात दाराभोवती रांगोळी, कंदील, फटाक्यांसह फराळाचा आस्वाद घेतला जातो.(suji ladoo without syrup) आठवड्याभरापूर्वीच फराळाचा सुगंध घरात दरवळू लागतो. करंजी, चिवडा, शंकरपाळे, चकली यांसारखे पदार्थ कधी परफेक्ट बनतात तर कधी बिघडतात.(soft rava ladoo) पण त्यातील एक सगळ्याचा आवडीचा पदार्थ गोलगरगरीत रव्याचा लाडू. (diwali special faral)
पारंपरिक पद्धतीने बनवताना अनेकदा पाकाचा वापर केला जातो. कधी कधी पाक जळते.(diwali special faral ladoo) हात भाजतात ज्यामुळे आपल्याला लाडू बनवताना अक्षरश:नाकी नऊ येतात. लाडू म्हटलं की घरातील सगळ्याच मंडळींना ते अधिक प्रमाणात आवडतात.(simple ladoo recipe) पण पाक न घालता एकदम सोप्या पद्धतीने रवा लाडू कसे बनवायचे, यासाठी लागणारे साहित्य आणि प्रमाण पाहूया.
अनारसे बिघडतात? घ्या अचूक प्रमाण, हलके- कुरकुरीत जाळीदार होतील अनारसे - पारंपरिक सिक्रेट टीप्स
साहित्य
बारीक रवा - २ वाटी
पिठी साखर- २ कप
साजूक तूप - अर्धा कप
दूध - १/२ कप
वेलची पूड -१/२ चमचा
बेदाणे आवडीप्रमाणे
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला कढई गरम करुन त्यात २ ते ३ मोठे चमचे तूप घालाव लागेल. त्यात रवा घालून मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. रवा थोडा कोरडा वाटू लागला की, पुन्हा २ चमचे तूप घाला. आता मंद आचेवर हलका असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. ज्यामुळे रव्याचा कच्चेपणा निघून जाईल.
2. यामध्ये आता आपल्याला अर्धा कप दूध घालावे लागेल. नंतर चमच्याने व्यवस्थित मिसळून घ्या. त्यात पिठी साखर घालून पुन्हा चमच्याने मिक्स करा. ५ ते १० मिनिटे चमच्याने ढवळून घ्या. आता त्यात हवं असल्यास चमचाभर तूप, वेलची पूड घाला. नंतर पुन्हा एकदा चमच्याने एकजीव करा.
3. कढईतले सारण चमच्याने व्यवस्थित दाबून घ्या. ज्यामुळे ते सेट होईल. गॅस बंद करुन झाकण झाकून ५ मिनिटे वाफ काढून घ्या. आता कढई खाली उतरवून त्यात ड्रायफ्रुट्स किंवा बेदाणे घाला. हाताने लाडू वळवून घ्या, हवे असल्यास वरुन ड्रायफ्रुट्स किंवा बेदाणे लावा. तयार होतील रवाळ, गोरगरगरीत बिना पाकातले रव्याचे लाडू.