दिवाळी म्हटलं की फराळाचा सुगंध घरोघरी दरवळत असतो.(Diwali faral) लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळ्या आवडीने केल्या जातात.(wheat shankarpali recipe) पण सध्याच्या काळात अनेकांना हेल्दी पण टेस्टी पदार्थ खावेसे वाटतात. त्यातीलच एक गव्हाच्या पीठाच्या शंकरपाळ्या. (shankarpali without maida)
आपण शंकरपाळ्या बनवताना मैद्याचा पिठाचा वापर करतो.(healthy Diwali snacks) त्यामुळे त्या जास्त खुसखुशीत होतात, पण त्या पचायला अगदी जड असतात. गव्हाच्या पिठात केल्यावर चव तर कायमच राहते,पण पचनही चांगले होते.(crispy wheat snacks recipe) या शंकरपाळ्या बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊसर, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या.(Indian festive snacks) या जास्त तेलकट होत नाही, दीर्घकाळ टिकतात आणि अगदी परफेक्ट होतात. गव्हाचं पीठ असल्यामुळे यात फायबर, प्रोटीन आणि मिनरल्स असतात, जे आरोग्यासाठी चांगले आहे.(homemade shankarpali) दिवाळीसारख्या सणात जेव्हा सगळं गोड आणि तेलकट खाल्लं जातं, तेव्हा या शंकरपाळ्या आरोग्यदायी असतात.(traditional Maharashtrian snacks) अचूक प्रमाणात बनवल्यास बिस्किटासारख्या खुसखुशीत आणि भरपूर पदर सुटणाऱ्या होतील. पाहूया साहित्य आणि कृती.
गुलाबजाम- रसगुल्ल्याचा पाक फेकून न देता करा झटपट ५ पदार्थ, पाक वाया न जाता चविष्ट पक्वान्न
साहित्य
गव्हाचे पीठ - ५ कप
दूध - १ कप
साखर - सव्वा कप
साजूक तूप - १ कप
वेलची पूड - अर्धा चमचा
कृती
1. सगळ्यात आधी गॅस पॅनवर ठेवून त्यात दूध घालून त्यात पिठी साखर घाला. चमच्याने चांगले ढवळून घ्या. साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करा. त्यात तूप घालून चमच्याने ढवळा. ज्यामुळे ते एकजीव होईल.
2. दूध-तुपाचे मिश्रण कोमट झाल्यानंतर बाऊलमध्ये काढा. त्यात चवीपुरता मीठ घाला. वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यात हळूहळू गव्हाचे पीठ घालून चमच्याने ढवळा. बॅटर तयार होईल, त्यात उरलेले पीठ घालून हाताने कणिक मळून घ्या. १० मिनिटे कणिक मळून घ्या.
3. पीठाचा गोळा घेऊन त्याला ठेचा म्हणजे ते मऊ होईल. आता चपाती लाटतो तसे लाटा. त्याला गोल आकारात दुमडून घ्या. पुन्हा गोळा करा. असं केल्याने त्याला जास्त पदर सुटतील. चपातीसारखे लाटा, नंतर सुरीच्या मदतीने चौकोनी आकारात कापा.
4. कढईत तेल तापवून मंद आचेवर लाल होईपर्यंत शंकरपाळी तळा. टिश्यू पेपरवर ठेवून शंकरपाळ्यांमधील तेल निघू द्या. तयार होतील मस्त कुरकुरीत गव्हाच्या शंकरपाळ्या.