Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापुरात फेमस डिस्को भाजी, नाव अजबगजब पण चव भन्नाट-पाहा चमचमीत रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 15:30 IST

Disco Bhaji Recipe : How To Make Disco Bhaji At Home : disco bhaji recipe at home : हॉटेलमधल्या स्टार्टर्सनाही मागे टाकेल अशी ही अस्सल गावरान 'डिस्को भजी'ची सोपी रेसिपी...

पुणेरी मिसळ आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी म्हणजे दोन्ही फारच लोकप्रिय आणि अप्रतिम चवीचे पदार्थ...पण या दोन्ही शहरांच्या खाद्यप्रेमींच्या मनावर एका खास पदार्थाने राज्य केलंय, तो म्हणजे 'डिस्को भजी'. नाव ऐकून थोडं वेगळं वाटलं तरी, या भजीची चव मात्र तितकीच जबरदस्त आणि भन्नाट असते. सोलापूर आणि पुण्याच्या अनेक कोपऱ्यांत, विशेषतः पावसाळ्यात किंवा कडाक्याच्या थंडीत, वाफाळलेल्या डिस्को भजीच्या गाडीवर होणारी गर्दी याच्या लोकप्रियतेची आणि चटपटीत चवीची खासियत सांगते. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि मसाल्यांच्या खास फोडणीमुळे तोंडाला पाणी सुटेल अशी चव असलेली ही भजी एकदा चाखली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटतेच...पावसाळा असो किंवा हिवाळा, डिस्को भजीशिवाय चहाची मैफल अपूर्णच वाटते. साध्या सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून झटपट तयार होणारी ही भजी, तिच्या चमचमीत चवीमुळे आजही अनेकांच्या आवडीच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत(How To Make Disco Bhaji At Home).

साधारण भजींपेक्षा (disco bhaji recipe at home) आकाराने गोल, आतून मऊ आणि बाहेरून अतिशय खुसखुशीत असलेली ही डिस्को भजी, जेव्हा तिखट-गोड चटणी आणि तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत सर्व्ह केली जातात, तेव्हा जिभेला जो झणझणीत, चमचमीत चटका मिळतो तो शब्दांत सांगणं कठीणच! हॉटेलमधल्या स्टार्टर्सनाही मागे टाकेल अशी ही अस्सल (Disco Bhaji Recipe) गावरान 'डिस्को भजी' कशी करायची याची रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. हिरव्या मिरच्या - १० ते १५ (आकाराने मोठ्या असलेल्या)२. बेसन - १ कप ३. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून४. ओवा - १/२ टेबलस्पून ५. खायचा सोडा - १/४ टेबलस्पून ६. जिरेपूड - १/२ टेबलस्पून  ७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून  ८. चाट मसाला - १ टेबलस्पून९. मीठ - चवीनुसार१०. पाणी - गरजेनुसार ११. तेल - तळण्यासाठी१२. हळद - १/२ टेबलस्पून

कुरकुरीत आवरण आणि चटपटीत सारण, खमंग मटार कचोरी करण्याची रेसिपी, हिवाळा स्पेशल नाश्ता...

विकतपेक्षा चांगले आणि अस्सल मोझरेला चीज घरी करण्याची सोपी रेसिपी, पिझ्झा-पास्ता की पराठा घाला चीज मनसोक्त...

कृती :- 

१. सगळ्यात आधी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्याव्यात. त्यानंतर या भाजीच्या बरोबर मधोमध सुरीने उभी चीर पाडून घ्यावी. २. दुसऱ्या एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात तांदुळाचे पीठ, ओवा, हळद, खायचा सोडा व चवीनुसार थोडं मीठ घालावं मग गरजेनुसार पाणी घालून मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करून घ्यावे. (जसे इतर भजींसाठी बेसन पिठाचे बॅटर तयार करतो तसेच करावे.)३. आता या बेसन पिठात मिरच्या घालून त्या व्यवस्थित कोटिंग करून घ्याव्यात. ४. कढईत तेल व्यवस्थित गरम करून त्यात या बेसन पिठात कोट करुन घेतलेल्या मिरच्या सोडून खमंग अशा तळून घ्याव्यात. 

५. तळून घेतलेल्या मिरच्या एका डिशमध्ये काढून घ्याव्यात त्यानंतर या भाजीचे छोटे - छोटे तुकडे करुन घ्यावेत. हे भजीचे तुकडे पुन्हा त्याच तेलात सोडून २ ते ३ मिनिटे खरपूस, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. ६. भजीला छान हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आणि खरपूस सुगंध आला की त्या कढईतून काढून एका बाऊलमध्ये घ्याव्यात. ७. दुसऱ्या एका छोट्या वाटीत जिरेपूड, लाल तिखट मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस चमच्याने कालवून एकत्रित करावेत. ही तयार पूड गरमागरम भजीवर वरुन भुरभुरवून घ्यावी. त्यानंतर भजी चमच्याने कालवून तो मसाला भाजीला लागेल असे एकजीव करावे. 

सोलापूर - पुण्याची खासियत असलेली चटपटीत, चमचमीत अशी गरमागरम डिस्को भजी खाण्यासाठी तयार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur-Pune's 'Disco Bhaji': A Delicious, Unique Street Food Sensation

Web Summary : Disco Bhaji, popular in Solapur and Pune, is a crispy, spicy street food. Made with green chilies and a flavorful batter, it's a must-try, especially during monsoon or winter. This snack is readily available and easy to make at home.
टॅग्स :अन्नपाककृती