Join us
Daily Top 2Weekly Top 5

A1 आणि A2 दुधात असतो फरक, पण मग आरोग्यासाठी कोणतं दूध ठरतं बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील वेगळेपण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:35 IST

A1 vs A1 Milk Difference In Marathi : आपण पाहिलं असेल की, A1 आणि A2 प्रकारच्या दूधाची लोकांमध्ये बरीच चर्चा बघायला मिळते. दूध हे आरोग्यासाठी खूप महत्वाचं असल्याने लोकांना या दोन्हीतील फरक समजून घ्यायचा असतो.

A1 vs A1 Milk Difference In Marathi : दूध आपल्या शरीरासाठी किती चांगलं असतं हे कुणाला वेगळं सांगण्याची गरज तर वाटत नाही. कारण दुधातून शरीराला किती पोषण मिळतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. दूधातून आपल्याला कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन आणि इतर पोषक तत्व मिळतात. गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल की, A1 आणि A2 प्रकारच्या दूधाची लोकांमध्ये बरीच चर्चा बघायला मिळते. दूध हे आरोग्यासाठी खूप महत्वाचं असल्याने लोकांना या दोन्हीतील फरक समजून घ्यायचा असतो. अनेकांना प्रश्न पडla की, दोनपैकी कोणतं दूध अधिक चांगलं? हेच आपण समजून घेणार आहोत. तेही सोप्या भाषेत...

मुळात A1 आणि A2 दुधातील फरक हा प्रोटीनमुळे ठरतो. दुधातील प्रोटीनला 'बीटा-केसीन' म्हटलं जातं. जे दोन प्रकारचं असतं म्हणजे A1 आणि A2. हे तेच प्रोटीन आहे जे या दोन प्रकारच्या दुधातील फरक आहे. 

A1 दूध काय आहे?

A1 दूध सामान्यपणे परदेशी प्रजातीच्या गायी जसे की, होल्स्टीन आणि जर्सीमधून मिळतं. काही संशोधनातून समोर आलंय की, A1 प्रोटीन पचनादरम्यान BCM - 7 नावाचा एक पदार्थ तयार होऊ शकतो, ज्यामुळे काही लोकांना पोट फुगणे, गॅस किंवा पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. पण सध्या यावर वैज्ञानिक रिसर्च करत आहेत. 

A2 दूध काय आहे?

A2 दूध हे भारतातील देशी प्रजातीच्या गायी जसे की, गिर, साहीवाल आणि सिंधी गायींपासून मिळतं. हे दूध पचनासाठी हलकं मानलं जातं. बऱ्याच लोकांचं असं मत आहे की, A2 दूध पोटासाठी हलकं आहे. याने गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटात जडपणा अशा गोष्टींचा त्रास दूर करण्यास मदत मिळते. 

मग आता कोणतं दूध चांगलं?

जर एखाद्या व्यक्तीला साधारण दूध प्यायल्यानंतर पोटात काही त्रास होत असेल म्हणजे पोट फुगत असेल किंवा अपचनाची समस्या होत असेल तर त्यांच्यासाठी A2 दूध चांगला पर्याय ठरू शकतं. दुसरीकडे ज्यांना असा काही त्रास होत नाही, ते आरामात A1 दूध पिऊ शकतात. दोन्ही प्रकारच्या दुधात कॅल्शिअम, प्रोटीन आणि पोषक तत्व जवळपास सारखेच असतात.

एक्सपर्टनुसार, दूध निवडताना केवळ A1 आणि A2 यातील अंतरावर नाही तर त्याच्या क्वालिटीवर, शुद्धतेवर आणि ते ताजं आहे की नाही यावर लक्ष द्यावं. जर आपल्याला पचनासंबंधी समस्या असेल तर योग्य निवडीसाठी डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्यावा.

English
हिंदी सारांश
Web Title : A1 vs A2 Milk: Which is healthier? Know the difference.

Web Summary : A1 and A2 milk differ in protein. A2, from Indian cows, is easier to digest. Choose based on digestion, freshness, and purity. Consult a doctor if needed.
टॅग्स :दूधअन्न