Join us

पावभाजी पराठा द्या मुलांच्या डब्यात, मुलं म्हणतील आई अजून हवा! चवीला उत्तम आणि पोषणही भरपूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2024 17:58 IST

Delicious & Quick Pav Bhaji Paratha : Pav Bhaji Paratha : How To Make Easy, Quick & Delicious Paav Bhaji Parataha : पावभाजी तयार करण्यासाठी जे साहित्य लागते त्याचाच वापर करून आपण पावभाजी फ्लेवरचा पराठा तयार करु शकतो...

'पावभाजी' हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पाव भाजी म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. गरमागरम पावभाजी खायला खूपच टेस्टी लागते. मुंबईतील रस्त्यांवर गाडीवर मोठा तवा ठेवून त्यावर लालचुटुक रंगांची, मखमली बटरमध्ये घोळवून घेतलेली ही भाजी यासोबतच गरम तव्यावर बटरमध्ये घोळवलेले पाव. या पाव भाजीच्या सुगंधाने पोट भरलेले असले तरीही परत भूक लागते आणि पावभाजी खाण्याचा मोह आवरता येत नाही. पावभाजी तर आवडीने खाल्लीच जाते पण तुम्ही कधी पावभाजी पराठा खाल्ला आहे का? (Delicious & Quick Pav Bhaji Paratha).

पावभाजी फ्लेवरचा पराठा करायला सोपा आणि खायला अगदी टेस्टी लागतो. घाईच्यावेळी अगदी झटपट तयार होणारा सोपा पदार्थ म्हणजे 'पराठा'. पराठा असा पदार्थ आहे की जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. कणकेच्या गोळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग भरुन आपण पटकन पराठा तयार करू शकतो. पावभाजी तयार करण्यासाठी जे साहित्य लागते त्याचाच वापर करून आपण पावभाजी फ्लेवरचा पराठा तयार करु शकतो. घरच्याघरीच झटपट पावभाजी पराठा (Pav Bhaji Paratha) कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Easy, Quick & Delicious Paav Bhaji Parataha).

साहित्य :- 

१. फ्लॉवर - १ कप २. गाजर - १ कप ३. फरसबी - १ कप ४. मटार - १ कप ५. तेल - ६ ते ७ टेबलस्पून ६. जिरे - १ टेबलस्पून ७. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)८. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ९. बटाटे - ५ (उकडलेले) १०. पाव भाजी मसाला - १ टेबलस्पून ११. गरम मसाला - १ टेबलस्पून १२. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून १३. हळद - १/२ टेबलस्पून १४. मीठ - चवीनुसार १५. कोथिंबीर - ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१६. गव्हाचे पीठ - ३ कप१७. बटर - ४ ते ५ टेबलस्पून

नीना गुप्ता यांना आवडणारा 'रोटीझ्झा' हा पदार्थ नेमका आहे काय? नाव भन्नाट आणि चव तर त्याहून भन्नाट...

हिवाळ्यात आवळा खाणं म्हणजे आरोग्यासाठी अमृत, पाहा आवळा खाण्याची ‘ही’ योग्य पद्धत...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी नेहमीप्रमाणे चपातीसाठी जशी कणीक मळून घेतो तशी कणीक मळून बाजूला ठेवून द्यावी. २. आता मटार, गाजर, फरसबी, फ्लॉवर मिक्सरमध्ये हलकेच फिरवून थोडे बारीक करून घ्यावे. ३. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे आणि आलं - लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालूंन फोडणी तयार करावी.  ४. आता या तयार फोडणीत मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या भाज्यांचे मिश्रण घालावे. हे सगळे मिश्रण तेलावर थोडेसे परतल्यानंतर त्यात उकडलेला बटाटा मॅश करून घालावा. आता त्यात पाव भाजी मसाला, गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून मिश्रण थोडे शिजवून घ्यावे. 

कोथिंबीर वडी आवडते पण बेसनाचा त्रास होतो? पाहा बेसन न वापरता कोथिंबीर वडीची कुरकुरीत रेसिपी...

५. आता मळून घेतलेल्या कणकेचे छोटे गोळे करून ते थोडे खोलगट करून घ्यावे. कणकेत तयार केलेले भाज्यांचे स्टफिंग भरून घ्यावे. त्यानंतर गोळे करून चपातीप्रमाणे गोलाकार पराठे लाटून घ्यावे. ६. तव्यावर थोडेसे तेल किंवा आपल्या आवडीप्रमाणे बटर सोडून हा तयार पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा. 

हा गरमागरम पाव भाजी पराठा खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा चटणीसोबत हा पराठा खाण्यासाठी सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती