दत्त जयंती म्हणजे भक्ती, पूजा, प्रसाद आणि उबदार वातावरणातलं घरगुती आनंदसोहळे. या दिवशी विविध गोडाचे पदार्थ तयार केले जातात. हिवाळा सुरु झाला की सगळ्यांना वेध लागतात ते गाजर हलवा खाण्याचे. थंडीत मिळणारा हा खास गोड पदार्थ.(Datta Jayanti special recipes) पण किती वेळाही गाजर हलवा बनवला तरी तो शिजून त्याचा गचका होतो. दूध आटून चिकट होतो किंवा त्याचा रंग देखील फिका पडतो. अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. (Gajar halwa recipe)
हलवाईसारखा लालसर, दाणेदार आणि सुगंधी गाजर हलवा घरी बनवणं थोडं कठीणच वाटतं. गाजर हलवा बनवताना नेमका वेळ, आच आणि प्रमाण यांची सांगड जमवणं खूप महत्वाचं ठरतं.हिवाळ्यातल्या ताज्या, रसाळ, लाल गाजरांचा सुगंधच वेगळा असतो.(Perfect carrot halwa tips) बाजारात गाजरांची चटकदार रांग पाहिली की वाटतं. आज घरी गाजर हलवा बनवायची. जर आपल्यालाही परफेक्ट हलवाईसारखा गाजर हलवा घरी करायचा असेल तर पाहा सोपी रेसिपी.
हिवाळ्यात वाढवा ताकद रोज खा पौष्टिक मल्टीग्रेन डोसा, मऊ जाळीदार डोशासाठी पाहा सोपी ट्रिक-मस्त रेसिपी
साहित्य
गाजर - १ किलो
तूप - ३ चमचे
दूध -१ लिटर
मावा - २०० ग्रॅम
साखर - ८० ग्रॅम
सुकामेवा - आवडीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून त्याच्यावरचे साल काढून घ्या. त्यानंतर गाजर लांब आकारात किसून घ्या. आता कढईमध्ये ३ चमचे तूप गरम करा. त्यात किसलेले गाजर घाला.
2. गाजर मऊ झाल्यानंतर त्यात १ लिटर दूध घालून मध्यम आचेवर ढवळत राहा. ज्यामुळे गाजर लवकर शिजेल. गाजरांचा रंग बदलल्यानंतर त्यात खवा घाला. वरुन साखर घालून पुन्हा चमच्याने ढवळा.
3. सर्व मिश्रण एकत्र होईपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. यानंतर आपल्या आवडीचा सुकामेवा घालून चांगले मिसळा. गरमागरम गाजर हलवा सर्व्ह करा.
