आपल्याकडे सण-समारंभ असो किंवा संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ, डाळ वड्यांना नेहमीच पसंती दिली जाते. तूर डाळ किंवा हरभरा डाळीपासून बनवलेला हा पारंपरिक पदार्थ चवीला जितका उत्कृष्ट लागतो, तितकाच तो बनवायलाही सोपा आहे. थंडीच्या दिवसांत, गरमागरम डाळ वड्यांचा खमंग स्वाद प्रत्येकाला भुरळ घालतो(Daal Vada Recipe).
बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे वडे चहा किंवा कॉफीसोबत अप्रतिम लागतात. वरून अतिशय कुरकुरीत आणि आतून मऊ असलेल्या या वड्यांचा खमंग वास सुटला की कोणाचीही भूक चाळवते. फारच कमी साहित्यात अगदी झटपट होणारा डाळ वडा घरच्याघरीच तयार करणं सोपं आहे...योग्य मसाले, डाळ भिजवण्याची अचूक पद्धत (How To Make Daal Vada At Home) आणि तळणीची खास टिप्स वापरल्यास डाळ वडे अधिक चवदार आणि कुरकुरीत होतात.
साहित्य :-
१. चणा डाळ - १ कप (पाण्यांत भिजवलेली)२. लसूण पाकळ्या - ५ ते ६ पाकळ्या३. आलं - २ छोटे तुकडे४. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या५. लाल सुकी मिरची - १ छोटी६. जिरे - १ टेबलस्पून ७. धणे - १/२ टेबलस्पून ८. बडीशेप - १/२ टेबलस्पून ९. काळीमिरी - ३ ते ४ दाणे १०. बारीक चिरलेला कांदा - १/२ कप ११. कोथिंबीर - १/२ कप १२. कडीपत्ता - ३ ते ४ पाने (बारीक चिरलेली)१३. हिंग - चिमूटभर१४. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून १५. मीठ - चवीनुसार१६. गरम तेल - २ टेबलस्पून
खमंग, खुसखुशीत मेथी वडी! एकदा केली तर घरातील सगळ्यांचीच होईल फेवरिट डिश - अस्सल पौष्टिक पदार्थ...
कृती :-
१. मिक्सरच्या एका भांड्यात रात्रभर पाण्यांत भिजवलेली चणा डाळ, लसूण पाकळ्या, आलं, हिरव्या मिरच्या, लाल सुकी मिरची असे सगळे जिन्नस एकत्रित घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. २. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जिरे, धणे, बडीशेप, काळीमिरी दाणे घालून त्याची बारीक अशी पूड तयार करून घ्यावी. ३. आता मिक्सर मध्ये वाटून घेतली डाळ एका बाऊलमध्ये घेऊन त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली बारीक पूड, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कडीपत्त्याची पाने, हिंग, तांदुळाचे पीठ, चवीनुसार मीठ व उकडवून घेतली चणा डाळ, गरम तेल घालावे. मग हे वड्याचे बॅटर एकत्रित कालवून घ्यावे.
४. हे बॅटर एकत्रित कालवून झाल्यावर झाकून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून द्यावे. ५. १० ते १५ मिनिटानंतर या तयार बॅटरचे गोलाकार मध्यम आकारचे थोडे चपटे असे वडे थापून घ्यावेत. ६. तयार वडे गरम तेलात खरपूस असे तळून घ्यावेत.
गरमागरम, कुरकुरीत, खुसखुशीत असे डाळ वडे खाण्यासाठी तयार आहेत. चटणी किंवा सॉससोबत हे वडे खाण्यासाठी अधिकच चविष्ट लागतात.
Web Summary : Daal vada, a popular snack made from lentils, is easy to make at home. This recipe details how to create crispy and soft Udupi-style daal vada with simple ingredients and specific techniques for a flavorful result. Enjoy this snack with tea or coffee.
Web Summary : दाल वड़ा, एक लोकप्रिय नाश्ता जो दाल से बनता है, घर पर बनाना आसान है। यह रेसिपी स्वादिष्ट परिणाम के लिए सरल सामग्री और विशिष्ट तकनीकों के साथ कुरकुरी और मुलायम उडुपी-शैली दाल वड़ा बनाने का तरीका बताती है। इस नाश्ते को चाय या कॉफी के साथ आनंद लें।