Join us

पचनाला उत्तम- पोटाला थंडावा देणारं काकडीचं थालीपीठ! उन्हाळ्यात खायलाच हवा असा पौष्टिक पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 14:27 IST

Cucumber Thalipeeth Recipe : Kakdiche Thalipeeth : How To Make a Cucumber Thalipeeth At Home : उन्हाळ्यातील हलका आणि पौष्टिक नाश्ता म्हणून काकडीचे थालीपीठ एकदम बेस्ट पर्याय आहे.

रणरणत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पचायला हलके पदार्थ खाणे फायदेशीर असते. उन्हाळयात आपण शक्यतो हिरवीगार काकडी ( Kakdiche Thalipeeth) अधिक प्रमाणांत खातो. उन्हाळ्यात काकडी (Cucumber Thalipeeth Recipe) खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे ती शरीरातील उष्णता कमी करते आणि पचनासाठी देखील फायदेशीर असते. उन्हाळ्यात आपण याच काकडीचे अनेक पदार्थ देखील करून खातो(How To Make a Cucumber Thalipeeth At Home).

काकडीची कोशिंबीर करण्यासोबतच आपण या हिरव्यागार काकडीचे थालीपीठ देखील करू शकतो. काकडीचे थालीपीठ हे चविष्ट, आरोग्यदायी आणि उन्हाळ्यात नाश्त्याला उत्तम असा पदार्थ आहे. शक्यतो थालीपीठात आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या घालून तयार करतो, परंतु खास उन्हाळ्यासाठी आपण अशाप्रकारचे काकडीचे थालीपीठ तयार करु शकतो. उन्हाळ्यातील सकाळचा किंवा संध्याकाळचा हलका आणि पौष्टिक नाश्ता म्हणून काकडीचे थालीपीठ एकदम बेस्ट पर्याय आहे. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचे असे काकडीचे थालीपीठ कसे करायचे ते पाहूयात.  

साहित्य :-

१. काकडीचा किस - २ कप २. मीठ - चवीनुसार ३. हळद - १ टेबलस्पून ४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ५. जिरेपूड - १ टेबलस्पून ६. धणेपूड - १ टेबलस्पून ७. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)८. कोथिंबीर - १ कप (बारीक चिरलेली)९. ज्वारीचे पीठ - १ वाटी१०. गव्हाचे पीठ - १/२ वाटी११. तांदळाचे पीठ - १/२ वाटी१२. बेसन पीठ - १/२ वाटी१३. ओवा - १ टेबलस्पून १४. तेल - गरजेनुसार१५. लसूण पाकळ्या - २ टेबलस्पून (किसलेल्या लसूण पाकळ्या)

साबुदाणा - बटाटा चकलीची इन्स्टंट रेसिपी! एवढीशी चकली फुलते पापडासारखी मोठी, चवही मस्त कुरकुरीत...

फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये कैरीचे लोणचे, पाहा लोणच्याची फक्कड रेसिपी...

कृती :- 

१. सर्वातआधी काकडी स्वच्छ धुवून तिचा देठा कडील भाग कापून घ्यावा. २. आता काकडी किसणीवर किसून त्याचा बारीक किस करून घ्यावा. ३. काकडीच्या किसमध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट मसाला, ओवा, जिरेपूड, धणेपूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेल्या लसूण पाकळ्या असे सगळे जिन्नस एकत्रित घालावेत. 

उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...

४. आता या तयार मिश्रणात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, बेसन पीठ घालून घ्यावे. आता सगळे जिन्नस एकत्रित करून पीठ मळून घ्यावेत.५. तयार पिठाचे गोळे करून घ्यावेत. आता एक स्वच्छ कॉटनचा रुमाल घेऊन तो संपूर्णपणे भिजवून घ्यावा. या भिजवलेल्या रुमालावर एक - एक गोळा ठेवून थालीपीठ थापून घ्यावे. ६. तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूने हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे. 

पाण्याच्या थेंबाचाही वापर न करता झटपट तयार होणारे खमंग काकडीचे थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. हे गरमागरम थालीपीठ आपण सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल