Lokmat Sakhi >Food > कुरकुरीत- चटपटीत कच्च्या केळीचे काप, १० मिनिटांत होईल चविष्ट तिखट पदार्थ

कुरकुरीत- चटपटीत कच्च्या केळीचे काप, १० मिनिटांत होईल चविष्ट तिखट पदार्थ

Crispy raw banana fry recipe: Spicy raw banana tawa fry: चमचमचीत तिखट चवीचे केळीचे काप वरण-भातासह तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2025 13:49 IST2025-04-28T13:48:25+5:302025-04-28T13:49:12+5:30

Crispy raw banana fry recipe: Spicy raw banana tawa fry: चमचमचीत तिखट चवीचे केळीचे काप वरण-भातासह तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त लागतात.

crispy spicy raw banana tawa fry 10 minutes easy tasty recipe | कुरकुरीत- चटपटीत कच्च्या केळीचे काप, १० मिनिटांत होईल चविष्ट तिखट पदार्थ

कुरकुरीत- चटपटीत कच्च्या केळीचे काप, १० मिनिटांत होईल चविष्ट तिखट पदार्थ

सकाळच्या नाश्त्यामध्ये अनेकजण केळी खातात. केळी खाल्ल्याने शरीराला पोटॅशियमसह अनेक जीवनसत्त्व मिळतात. (Quick banana fry recipe) केळीपासून अनेक पदार्थांची चव चाखली जाते.(Vegan raw banana fry) इतकचं नाही तर कच्ची केळी देखील आवडीने खाल्ली जाते.(Raw banana tawa fry without deep frying) केळी फक्त आरोग्यासाठी नाही तर ती त्वचा आणि केसांसाठी देखील तितकीच उपयोगी आहे.(Healthy raw banana snack) 
केळीमध्ये पोटॅशियम, लोह, जस्त यांसारखे खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात.(Tawa-fried banana slices) यामुळे केळी हे ऊर्जेचे स्त्रोत मानले जाते. कच्च्या केळीचे चिप्स, वेफर्स, भाजी आणि भजी असे अनेक पदार्थ आपण टेस्ट केलेच असतील.(Instant raw banana fry recipe) पण कच्च्या केळीचे काप कधी खाल्ले आहेत का? चमचमचीत तिखट चवीचे काप वरण-भातासह तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त लागतात. कसे बनवायचे पाहूया.(Homemade raw banana fry) 

घरच्या घरी करा कंडेंस्ड मिल्क, विकतपेक्षा पण भारीच होईल मिल्कमेड, झटपट रेसिपी

साहित्य 
कच्ची केळी - २ 
हळद - १ चमचा
लाल मिरची पावडर - २ चमचा 
घरगुती मसाला - १ चमचा 
मीठ - आवश्यकतेनुसार 
तांदळाचा रवा - १ कप 
तेल 

">

कृती 

1. सगळ्यात आधी केळीच्या वरचे साल काढून घ्या. त्यानंतर सुरीने त्याचे लांब काप करा. 

2. आता एका भांड्यात कापलेल्या केळीचे काप, हळद, लाल मिरची पावडर, घरगुती मसाला आणि मीठ घालून चांगले एकजिव करा. १० ते १५ मिनिटांसाठी झाकूण ठेवा. 

3. एका ताटात तांदळाचा रवा, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिक्स करा. केळीच्या कापांना यामध्ये फिरवून घ्या. 

4. पॅनमध्ये तेल गरम करुन तयार केळीचे काप फ्राय करुन घ्या.

 

Web Title: crispy spicy raw banana tawa fry 10 minutes easy tasty recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.