Join us
Daily Top 2Weekly Top 5

साबुदाणा वडा विसराल! महाशिवरात्रीनिमित्त उपवासाला करा कच्च्या केळीचे कुरकुरीत वडे, कमी तेलकट- झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 18:00 IST

Maha Shivratri fasting recipe: Raw banana vada: Upvas recipes: कच्च्या केळीचे वडे कसे करायचे पाहूया.

महाशिवरात्री आली अनेक भक्त महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात. उपवास म्हटलं की आपल्याकडे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा बटाट्याचे पदार्थ आवर्जून केले जातात. पण अनेकदा साबुदाणा खाल्ल्यानंतर पोट जड होते, ॲसिडिटी किंवा गॅस होण्याची समस्या सतावते.(Maha Shivratri fasting recipe) साबुदाण्यात स्टार्चचे प्रमाण अधिक असल्यामुळे तो पचायलाही अधिक जड असतो. अशावेळी काही नवीन पर्याय शोधत असाल तर कच्च्या केळीचे वडे नक्की ट्राय करुन बघा. (Raw banana vada)हे वडे चवीला अगदी साबुदाण्याच्या वड्याप्रमाणे कुरकुरीत लागतात. कमी तेलात आणि पचायला हलके देखील असतात. कच्ची केळी ही ऊर्जेचा चांगला स्त्रोत आहेत.(Upvas recipes) यात पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने उपवासाच्या दिवशी येणारा थकवा दूर करण्यास मदत होते. बटाट्याला उत्तम पर्याय म्हणून कच्च्या केळीचा वापर केला जातो. कच्च्या केळीचे वडे कसे करायचे पाहूया. 

मुलांच्या डब्यासाठी टेस्टी पर्याय! रव्याचे कटलेट करण्याची सोपी पद्धत- कमी तेलातला कुरकुरीत पदार्थ

साहित्य 

कच्च्या केळी - २ शेंगदाण्याचा कूट - १ वाटी हिरव्या मिरची - ४ ते ५जिरे - १ छोटा चमचा मीठ - चवीनुसार कोथिंबीर - आवडीनुसार तेल - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी कच्च्या केळीचे दोन तुकडे करुन कुकरमध्ये थोडे पाणी घालून २ शिट्ट्या करुन घ्या. केळीचा गाळ होणार नाही याची काळजी घ्या. शिट्टी झाल्यानंतर केळी काढून घ्या आणि पूर्णपणे गार होऊ द्या. 

2. उकडलेल्या केळीची सालं काढून ती एका भांड्यात किसून घ्या. त्यात शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचाचा ठेचा, जिरे, मीठ आणि कोथिंबीर घाला. साखरही घालू शकता. सर्व साहित्य पीठासारखे मळून घ्या. 

3. हाताला थोडे तेल लावून तयार पिठाचे छोटे गोळे करा. त्यांना हातावर ठेवून थोडे चपट्या वड्याचा किंवा कटलेटचा आकार द्या.

4. आता कढईत तेल गरम करा. वडे मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी गोल्डन होईपर्यंत शॅलो फ्राय करुन घ्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Mahashivratri Special: Crispy Raw Banana Vada Recipe - A Healthier Alternative

Web Summary : Skip sabudana this Mahashivratri! Try raw banana vadas: crispy, less oily, and easy to digest. A great source of energy and fiber, perfect for fasting.
टॅग्स :अन्नपाककृतीमहाशिवरात्री