Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > हॉटेलसारखी खमंग- कुरकुरीत पालक वडी, १ खास ट्रिक- वड्या होतील कमी तेलकट- खुसखुशीत, सोपी रेसिपी

हॉटेलसारखी खमंग- कुरकुरीत पालक वडी, १ खास ट्रिक- वड्या होतील कमी तेलकट- खुसखुशीत, सोपी रेसिपी

palak vadi recipe: crispy palak vadi: healthy evening snacks: पाहूया खमंग- कुरकुरीत पालक वडी करण्याची सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 09:30 IST2026-02-04T09:30:00+5:302026-02-04T09:30:02+5:30

palak vadi recipe: crispy palak vadi: healthy evening snacks: पाहूया खमंग- कुरकुरीत पालक वडी करण्याची सोपी रेसिपी.

crispy palak vadi recipe at Home how to make less oily palak vadi healthy spinach snack recipe for kids khamang palak vadi Marathi recipe easy Indian tea time snack recipe | हॉटेलसारखी खमंग- कुरकुरीत पालक वडी, १ खास ट्रिक- वड्या होतील कमी तेलकट- खुसखुशीत, सोपी रेसिपी

हॉटेलसारखी खमंग- कुरकुरीत पालक वडी, १ खास ट्रिक- वड्या होतील कमी तेलकट- खुसखुशीत, सोपी रेसिपी

संध्याकाळच्या चहासोबत आपल्यापैकी अनेकांना काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खायला हवं असतं. अशावेळी आपण कांदा भजी, कोथिंबीर वडी, पालक भजी बनवतो.(palak vadi recipe) पण चवीसोबत आरोग्यही जपायचे असेल तर पालक वडी हा चांगला पर्याय आहे.(healthy evening snacks) पालकाची भाजी म्हटलं की मोठ्यांसह मुले देखील नाक मुरडतात. पालक चवीला कडवट असली तरी यात अनेक गुणकारी घटक असतात जे आपल्या तब्येतीसाठी चांगले आहेत. (crispy palak vadi)
पालकाची भाजी बनवण्यापेक्षा पराठे, सूप, कटलेट, भजी असे पदार्थ तर सर्वचजण आवडीने खातात. पालकांची कुरकुरीत, खमंग वडी बनवायची म्हटलं की अनेकदा ती कडक होते, तळताना अधिक तेलकट होते. अशावेळी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर खमंग वडी अगदी काही मिनिटांत होतील. पाहूया खमंग- कुरकुरीत पालक वडी करण्याची सोपी रेसिपी. 

न भिजवता, न वाटता करा जाळीदार बेन्ने डोसा; १५ मिनिटांत होईल नाश्ता, पाहा सोपी साउथ इंडियन रेसिपी

साहित्य 

पालक - २ जुड्या 
बेसनाचे पीठ - दीड वाटी 
तांदळाचे पीठ - अर्धी वाटी 
हिरव्या मिरच्या - ३
आले - १ तुकडा 
लसूण - १५ पाकळ्या 
तीळ - २ मोठे चमचे 
हळद - १/२ चमचा 
मीठ - चवीनुसार 
पाणी - १/४ वाटी किंवा गरजेनुसार 
तेल - तळण्यासाठी 

कृती 

1. सगळ्यात आधी पालक स्वच्छ करुन धुवून घ्या. यानंतर पालक बारीक चिरून घ्या. एका बाऊलमध्ये चिरलेला पालक, बेसन, तांदळाचे पीठ घाला. त्यात हिरवी मिरची, आले आणि लसणाची पेस्ट तयार करुन मिश्रणात घाला. त्यात तीळ, हळद आणि चवीनुसार मीठ घाला. 

2. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.  हाताला थोडे तेल लावून या पिठाचे लांब रोल्स करा. स्टीमरच्या ट्रेला किंवा ताटाला तेल लावून त्यावर हे रोल्स ठेवा. 

3. मध्यम आचेवर २० ते ३० मिनिटे वड्या वाफवून घ्या. वाफवलेले रोल्स थंड झाल्यानंतर त्याचे काप करा. 

4. कढईत तेल गरम करा. मध्यम आचेवर कुरकुरी होईपर्यंत शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करा. गरमा गरम पालक वड्या हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपसबोत सर्व्ह करा. 

 


Web Title : कुरकुरी पालक वडी रेसिपी: स्वादिष्ट, कम तेल वाली और बनाने में आसान।

Web Summary : कुरकुरा, हेल्थी स्नैक चाहते हैं? यह पालक वडी रेसिपी तली हुई स्नैक्स का स्वादिष्ट और स्वस्थ विकल्प है। कुछ सरल ट्रिक्स से, आप घर पर स्वादिष्ट, कम तेल वाली और पूरी तरह से कुरकुरी पालक वडी बना सकते हैं।

Web Title : Crispy Palak Vadi Recipe: Delicious, less oily, and easy to make.

Web Summary : Craving a crispy, healthy snack? This Palak Vadi recipe offers a tasty and healthy alternative to fried snacks. With a few simple tricks, you can make delicious, less oily, and perfectly crispy spinach bites at home.