आपल्या चिमुकल्यांना केळी खायला प्रचंड आवडते. कारण याची चव फक्त गोड नाही तर ती मऊ आणि सहज खाता येते. इतकंच नाही तर यामुळे मुलांचे पोट देखील भरलेले राहते.(banana appe recipe) केळी ही मुलांसाठी सगळ्यात चांगले फळ समजले जाते. मात्र रोज तेच तेच केळं खायला दिलं की मुलं कंटाळतात. अशावेळी पालकांसमोर प्रश्न उभा राहतो केळी हेल्दी पद्धतीने मुलांना खाऊ कशी घालायची. (ripe banana snacks)याच प्रश्नाचं चविष्ट उत्तर म्हणजे बनाना केक अप्पे. हे अप्पे दिसायला केकसारखे, चवीला गोड आणि आतून मऊ असल्यामुळे मुलांना खूप आवडतात. यामध्ये जास्त मैदा किंवा जास्त साखर नसल्यामुळे आपण मुलांना खाऊ घालू शकतो. डब्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा सुट्टीच्या दिवशी खास पदार्थ म्हणून हे अप्पे उत्तम पर्याय ठरतात. ही रेसिपी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य पाहूया. (kids healthy snacks)
फक्त ३०० रुपयांत प्रिंटेड स्टायलिश वन पीस ड्रेस, ५ पॅटर्न- कॉलेज असो की पार्टी, दिसाल क्लासी
साहित्य
पिकलेली केळी- ७५ ग्रॅमदूध - १/४ कप तेल - २ मोठे चमचे वितळलेले लोणी (Butter) - १ मोठा चमचा पिठी साखर- १/४ कप + २ मोठे चमचे मैदा- ३/४ कप बेकिंग पावडर- १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा- १/४ छोटा चमचा अक्रोड (तुकडे केलेले)- १/४ कप
कृती
1. सगळ्यात आधी दूध आणि पिकलेली केळी मिक्सरमध्ये फिरवून त्याची स्मूथ प्युरी तयार करुन एका बाऊलमध्ये काढा.
2. तयार प्युरीत तेल, बटर, पिठी साखर घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिसळा. त्यात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून चाळणीने चाळून घ्या. आता हे सर्व मिश्रण विस्करच्या साहाय्याने गाठी न राहू देता नीट मिसळा. नंतर यात अक्रोडचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा.
3. गॅसवर एक अप्पे पात्र ठेवा. मध्यम-कमी आचेवर ५ मिनिटे प्री-हीट होऊ द्या. मंद आचेवर अप्पे पात्राच्या खाचांमध्ये बॅटर ओता. वरून थोडी जागा शिल्लक ठेवा जेणेकरून केक फुगायला जागा मिळेल.
4. आता झाकण ठेवून १५-२० मिनिटे किंवा जोपर्यंत मधला भाग पूर्णपणे शिजत नाही, तोपर्यंत वाफवून घ्या. अप्पे तयार झाले की लगेच पात्रातून बाहेर काढा आणि गरमागरम खा.
Web Summary : Banana appe is a healthy and tasty snack for kids. Made with ripe bananas, milk, and wheat flour, these appe are soft, cake-like, and perfect for lunchboxes or evening snacks. Ready in just 15 minutes!
Web Summary : केले के अप्पे बच्चों के लिए एक स्वस्थ और स्वादिष्ट नाश्ता है। पके केले, दूध और मैदा से बने ये अप्पे नरम और केक जैसे होते हैं, जो दोपहर के भोजन या शाम के नाश्ते के लिए एकदम सही हैं। केवल 15 मिनट में तैयार!