हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत गरमागरम आणि कुरकुरीत काहीतरी खाण्याची इच्छा झाली की, डोळ्यांसमोर पहिले नाव येते ते म्हणजे पकोडे. या थंडीच्या दिवसांत बाजारात हिरवेगार मटार दाणे फार मोठ्या प्रमाणावर विकायला येतात. ताजे आणि गोड हिरवे मटार दाणे घरोघरी हमखास विकत आणले जातात, मग थंडीच्या दिवसांत या मटार दाण्यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची रेलचेल सुरु होते. गोडसर चव आणि पौष्टिक गुणांनी भरलेले मटार अनेक पदार्थांमध्ये वापरले जात असले तरी थंड वातावरणात गरमागरम आणि कुरकुरीत मटार पकोडे खाण्याची मजा काही वेगळीच असते. बाहेर गारवा आणि हातात गरम चहाचा कप - अशावेळी खुसखुशीत मटार पकोडे म्हणजे सुखचं...नेहमीची कांदा, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल, तर मटारचे हे खुसखुशीत पकोडे तुमच्या संध्याकाळच्या चहाची रंगत वाढवतील. मटार आरोग्यासाठी उत्तम तर आहेतच, पण त्यापासून बनवलेले 'मटार पकोडे' चवीला अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत लागतात. मटारमध्ये मुबलक फायबर आणि पोषक तत्वे असतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात(Matar Pakoda Recipe).
नेहमीचीच कांदा किंवा बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल, तर आपण कमी तेलकट आणि परफेक्ट मटार पकोडे घरच्याघरीच करु शकता. घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी चवीला जितकी स्वादिष्ट तितकीच बनवायलाही सोपी आहे. ताज्या मटार दाण्यांचा सुगंध, मसाल्यांचा हलका तडका आणि परफेक्ट कुरकुरीत (Crispy green pea pakoda) टेक्स्चर यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. थंडीच्या संध्याकाळी वाफाळलेल्या चहासोबत हे मटार पकोडे म्हणजे एक सुखद मेजवानीच! हिरव्यागार ताज्या मटार दाण्यांचे (How To Make Matar Pakoda At Home) चमचमीत, कुरकुरीत पकोडे करण्याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. मटार दाणे - २ कप (उकडलेले मटार)२. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)३. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून५. कांदा - लसूण मसाला - १ टेबलस्पून ६. बेसन - २ ते ३ टेबलस्पून ७. तांदूळ पीठ - २ ते ३ टेबलस्पून ८. कॉर्नफ्लॉवर (मक्याचं पीठ) - २ ते ३ टेबलस्पून९. मीठ - चवीनुसार१०. तेल - तळण्यासाठी ११. पाणी - गरजेनुसार
२ कप रव्याच्या होतील १०० पाणीपुरीच्या पुऱ्या! पुरी फुगेल फुग्यासारखी टम्म, कुरकुरीत...
रात्री-अपरात्री लागणारी भूक आता वाढवणार नाही वजन! मध्यरात्री खायचेच तर बिंधास्त खा ‘हे’ पदार्थ...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. गरम पाण्यांत मटार दाणे घालून ते उकडवून घ्यावेत. २. उकडलेले मटार दाणे एका बाऊलमध्ये काढून ते चमच्याने हलकेच दाब देत दाबून मॅश करून घ्यावेत. एकदम बारीक न करता जाडसर भरड तयार करून घ्यावी. ३. या मटार दाण्याच्या कुस्करून घेतलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पांढरे तीळ, कांदा - लसूण मसाला, बेसन,तांदूळ पीठ, कॉर्नफ्लॉवर घालावे. मग या मिश्रणात, चवीनुसार मीठ व गरजेनुसार थोडं - थोडं पाणी घालून भजीसाठीचे बॅटर तयार करून घ्यावे. सगळे मिश्रण चमच्याने कालवून बॅटर एकजीव करून घ्यावे.
४. कढईत तेल ओतून ते चांगले कडकडीत गरम करून घ्यावे. गरम तेलात चमच्याने मिश्रणाचे छोटे - छोटे गोळे घालून खरपूस असे तळून घ्यावे. भजीला हलकासा गोल्डन - ब्राऊन रंग आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत तेलात नीट तळून घ्यावी.
गरमागरम मटार पकोडा खाण्यासाठी तयार आहे. वाफाळत्या चहा, कॉफी सोबत हिरवीगार चटणी आणि मटारचे कुरकुरीत पकोडे खाण्याची मज्जा काही औरच असते.
Web Summary : Enjoy crispy green pea pakoras this winter! This easy recipe uses fresh peas, spices, and flours for a tasty, healthy snack. Perfect with tea on a cold evening.
Web Summary : इस सर्दी में कुरकुरे हरे मटर के पकोड़े का आनंद लें! यह आसान रेसिपी ताज़ी मटर, मसालों और आटे का उपयोग करके एक स्वादिष्ट और स्वस्थ नाश्ता बनाती है। ठंडी शाम को चाय के साथ बिल्कुल सही।