Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून कुरकुरीत आणि आतून चिजी! स्पेशल गरमागरम मिरची भजी, संध्याकाळच्या चहासोबत मस्त बेत- सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 09:30 IST

Deep fried cheese chilli snacks: Cheese burst chilli pakora: स्टार्टर म्हणून किंवा स्पेशल बेत म्हणून ही चीज मिरची भजी कशी करायची पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा.

संध्याकाळच्या वेळी आपल्याला छोटीशी भूक लागते. अशावेळी चहा-कॉफीसोबत गरमागरम कुरकुरीत भजी असतील तर दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.(Deep fried cheese chilli snacks) आपण नेहमीच कांदा भजी, बटाटा भजी किंवा साधी मिरची भाजी खातो. आपल्या नेहमीच्या चवीपेक्षा काहीतरी हटके आणि चविष्ट खायचे असेल तर चीज मिरची भजी ट्राय करु शकतो. (Cheese burst chilli pakora)बाहेरुन बेसन पिठाचे कुरकुरीत आवरण आणि आतून मेल्टेड चीजच्या चवीचा अद्भूत संगम असतो. मिरचीचा तिखटपणा आणि चीजचा क्रीमीपणा एकमेकांना इतकी छान साथ देतात की, एक भजी खाऊन कोणाचेच मन भरत नाही. विशेषतः मुले, जी सहसा तिखट मिरची खाताना नाकं मुरडतात, ती सुद्धा ही 'चिजी' भजी आवडीने मागून खातात.(Stuffed mirchi pakoda with cheese) स्टार्टर म्हणून किंवा स्पेशल बेत म्हणून ही चीज मिरची भजी कशी करायची पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा. 

गाडीवर मिळतो तसा झणझणीत चुरा वडापाव करा घरीच, कुरकुरीत वड्याची सोपी रेसिपी - उन्हाळी सुटीत मुलांसाठी खास खाऊ

साहित्य 

भावनगरी मिरच्या - ६ ते ७ किसलेले चीज - १ वाटी हिरवी मिरची, लसूण, आले पेस्ट - १ छोटी वाटी मीठ - चवीनुसार आमचूर पावडर - चवीनुसारलिंबाचा रस - १ चमचाबेसनाचे पीठ - दीड वाटीओवा- १ चमचापाणी - आवश्यकतेनुसारकोथिंबीर - बारीक चिरलेला बेकिंग सोडा - चवीनुसारतेल- तळण्यासाठी 

कृती 

1. सगळ्यात आधी भावनगरी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्या. यानंतर मिरचीचे टोक कट करा. सुरीच्या मदतीने मध्यभागी चिरा पाडून त्यातील बिया काढा. 

2. आता बाऊलमध्ये किसलेले चीज, हिरवी मिरची- लसूण-आले पेस्ट घाला. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. आता पाईपिंग बॅगमध्ये चीजचे मिश्रण भरा. चिरलेल्या मिरचीमध्ये तयार सारण भरा. 

3. यानंतर कपभर बेसनाचे पीठ घ्या. त्यावर ओवा हाताने चोळून घ्या. त्यात मीठ आणि पाणी घालून मिश्रण जाडसर करा. वरुन कोथिंबीर आणि खाण्याचा सोडा घालून पुन्हा फेटून घ्या. 

4. आता एका बाऊलमध्ये बेसनाचे उरलेले पीठ घ्या. त्यामध्ये भरलेली मिरची डीप करा. यानंतर बेसनाच्या पिठात ती मिरची घोळावा. कढईत तेल तापवून त्यात मिरची डीप फ्राय करा. कुरकुरीत तळल्यानंतर खा गरमागरम खमंग चीज मिरची भजी.  

English
हिंदी सारांश
Web Title : Crispy, cheesy chilli bhaji: Perfect tea-time snack, easy recipe.

Web Summary : Enjoy cheese chilli bhaji, a unique snack with a crispy coating and melted cheese inside. This easy recipe is perfect as a starter or for a special treat, offering a delightful mix of spicy and creamy flavors that even kids will love.
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल