Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोबीच्या पानांची भाजी नाही भजी करा, चमचमीत- कुरकुरीत पदार्थ; मिरची भजीपेक्षा भारी चव, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2026 09:30 IST

cabbage leaf fritters: crispy cabbage pakora: cabbage bhaji recipe: कोबीच्या पानांची भजी कशी करायची पाहूया.

सकाळचा किंवा संध्याकाळचा नाश्ता आपल्याला वेगळा काही तरी हवा असतो. संध्याकाळच्या चहाची वेळ, गरमागरम आणि कुरकुरीत भजी समोर आली की कुणाचाही ताबा सुटतो.(cabbage leaf fritters) आपण कांदा भजी, बटाटा भजी किंवा मिरची भजी आवडीने खाल्ली जाते. पण कधी विचार केला आहे का की, ज्या कोबीच्या पानांची आपण फक्त भाजी किंवा कोशिंबीर करतो, त्यापासून चक्क मिरची भजीपेक्षाही चविष्ट असा पदार्थ आपल्याला तयार करता येईल. (crispy cabbage pakora)कोबीची भाजी म्हटलं की अनेकजण नाक मुरडतात, पण जेव्हा आपण याच कोबीच्या पानांपासून कुरकुरीत भजी बनवू, तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील.(cabbage bhaji recipe) ही भजी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी पण अतिशय सोपी आहे. कोबीच्या पानांची भजी कशी करायची पाहूया. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा. 

ढोकळा कच्चा राहतो, फुगत नाही? ३० मिनिटांत करा जाळीदार मऊ ढोकळा, होईल कापसाहून हलका-सोपी रेसिपी

साहित्य 

कोबी - २उकडलेले बटाटे- ५ ते ६आले - १ इंच हिरव्या मिरची - २कांद्याच्या बिया - १ चमचा कांदा - १जिरे पावडर - १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचाचाट मसाला - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा कोथिंबीर - आवश्यकतेनुसार मीठ - चवीनुसार लिंबाचा रस - अर्धा चमचा बेसन - १ कपतेल - तळण्यासाठी  

कृती

1. सगळ्यात आधी गॅसवर पातेल ठेवून त्यात पाणी घाला. कोबी घालून ५ ते ६ उकळवून घ्या. यानंतर कोबीची पाने वेगळी करा. 

2. आता एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा, आले- मिरची, कांद्याच्या बिया, उभा चिरलेला कांदा, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करा. 

3. यानंतर कोबीच्या पानांमध्ये तयार मिश्रण भरून व्यवस्थित बंद करा. एका बाऊलमध्ये बेसनाचे पीठ, मीठ, हळद आणि पाणी घालून बॅटर तयार करा. 

4. बेसनाच्या पिठात कोबीची भजी डीप करा. तेल गरम करुन त्यात भजी मंद आचेवर तळून घ्या. तयार होईल गरमागरम कुरकुरीत कोबीच्या पानांची भजी.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cabbage leaf fritters: A crispy, tasty snack better than chili fritters.

Web Summary : Transform cabbage leaves into delicious, crispy fritters, a unique and easy snack. Boiled potatoes and spices are mixed, stuffed in cabbage leaves, dipped in batter, and fried until golden. Enjoy this tasty alternative to traditional fritters.
टॅग्स :अन्नपाककृती