रोजच्या स्वयंपाकात वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी आपण खोबऱ्याचा वापर करतो. ओलं खोबरं वापरायचं म्हटलं तर सर्वातसाधी नारळ फोडावा लागतो मग आतील पांढरं शुभ्र खोबरं खवून घ्यावं लागत. खोबरं हवं असेल तर सर्वात आधी नारळ फोडण्याची तयार करावी लागते. कठीण, टणक आवरण असलेला नारळ फोडणे सोपे काम नाही. नारळ फोडणे आणि त्याचे टणक, कवच वेगळे करणे हे स्वयंपाकघरातील सर्वात वेळखाऊ आणि किचकट कामांपैकी एक मानले जाते. पारंपारिक पद्धतीने नारळ (pressure cooker coconut cracking trick) फोडताना खूप मेहनत लागते, वेळ जातो आणि अनेकदा इजा होण्याची भीतीही असते. विशेषतः जेव्हा आपण हाताने नारळ फोडतो तेव्हा खूप मेहेनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत, आपण नारळ सोलण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि ट्रिक्स वापरुन पहातो(easy coconut cracking method).
नारळ फोडण्यासाठी आपण फारशी मेहेनत न घेता एक साधीसोपी ट्रिक वापरु शकतो. दक्षिण भारतातील गृहिणी वापरत असलेली एक अप्रतिम, सोपी आणि वेळ वाचवणारी युक्ती म्हणजे प्रेशर कुकरच्या मदतीने अगदी मिनिटभरात नारळ फोडणे. तुमचा नेहमीचा प्रेशर कुकर वापरून तुम्ही फक्त काही मिनिटांत नारळाचे कवच सहजपणे वेगळे करू शकता. या ट्रिकमुळे तुमची नारळ फोडण्याची मेहनत ९०% कमी होईल आणि तुम्हाला अगदी झटपट काही मिनिटांतच नारळ फोडून स्वच्छ पांढरंशुभ्र खोबरं मिळेल. या पद्धतीत नारळ फोडण्यासाठी ना ताकद लावावी लागते, ना वेळ खर्च होतो. फक्त काही मिनिटांत नारळ (crack coconut with pressure cooker) आपोआप फोडला जातो.
प्रेशर कुकरच्या मदतीने नारळ फोडण्याची सोपी ट्रिक...
सगळ्यांतआधी नारळ पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये नारळ पूर्णपणे बुडेल इतके पाणी भरा. पाणी व्यवस्थित गरम असेल याची सर्वातसाधी खात्री करून घ्या. कुकरचे झाकण व्यवस्थित लावून घ्या. कुकर गॅसवर मध्यम आचेवर ठेवा. या कुकरला तीन ते चार शिट्ट्या होऊ द्या. चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.
कणीक चांगली तिंबली तरी चपात्या कडक-वातडच होतात? ६ टिप्स-चपात्या फुगतील टम्म-राहतील दोन दिवस मऊ...
गॅस बंद केल्यावर, कुकरमधील वाफ पूर्णपणे निघून जाऊ द्या, मगच झाकण उघडा. कुकरचे झाकण उघडा आणि नारळ चिमट्याच्या किंवा जाड कापडाच्या मदतीने बाहेर काढा. नारळ थोड्या थंड पाण्यात बुडवा, ज्यामुळे तो लगेच थंड होईल आणि फोडणे सोपे जाईल. मग तुम्ही पाहू शकता की, आता नारळाची करवंटी आणि आतील खोबरे जवळजवळ वेगळे झालेले दिसेल.
कॉफी पावडर सुकून कडक झाली, बाटलीतून निघता - निघत नाही ? ६ टिप्स - कॉफी वाया जाणार नाही...
या गरम झालेल्या नारळाला जमिनीवर किंवा कठीण पृष्ठभागावर हलक्या हाताने एकदा मारा. तुम्हाला दिसेल की नारळाचे खोबरे आणि करवंटी सहजपणे वेगळे झालेले असेल. या पद्धतीमुळे नारळ फोडण्याची आणि त्याचे खोबरे काढण्याची मेहनत ९०% कमी होते आणि नारळ सहजपणे फोडणे शक्य होते.
