Join us

कॉर्न चिला म्हणजेच मक्याचं धिरडं करा नाश्त्याला, मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी खास पावसाळी खमंग बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 11:03 IST

healthy corn recipes for children : school lunchbox recipes Indian: कॉर्न चिला करण्यासाठी लागणारे साहित्य आणि सोपी पद्धत पाहूया.

पावसाळा सुरु झाला की आपल्याला मका पाहायला मिळतो.(Morning breakfast idea) भाजलेला मका, मक्याचे दाणे, मक्याचा चाट यांसारख्या विविध प्रकारे मक्याची चव चाखली जाते. सकाळच्या नाश्त्यात काय बरं करावं असा प्रश्न अनेकांना पडतो.(healthy corn recipes for children) सकाळचा नाश्ता चविष्ट आणि आरोग्यदायी असावा आणि झटपट बनवा असं प्रत्येकाला पडतो.(school lunchbox recipes Indian) याआधी आपण बेसन, नाचणी आणि मेथीचा चिला आपण खाल्ला असेलच पण तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला देखील वैताग येतो. अशावेळी नाश्त्यात नवीन पदार्थ खावेसे वाटतात.(tasty and easy chilla for rainy season) सकाळच्या नाश्त्यात आपण मक्याचा चिला ट्राय करु शकतो. मक्याच्या दाण्यांपासून तयार केला जाणारा हा चिला आरोग्यासाठी पौष्टिक आहे.(kids-friendly tiffin snack) यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कार्बोहायड्रेट्स असते जे आपल्याला शरीरातील अशक्तपणा कमी करते. रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते. कॉर्न चिला करण्यासाठी लागणारे साहित्य आणि सोपी पद्धत पाहूया. 

कुरकुरीत कांदा भजी लगेच मऊ पडतात? पीठ कालवताना ‘इतकंच’ करा, भर पावसात भजी सादाळणार नाहीत..

साहित्य 

मका - १ आल्याचे बारीक तुकडे लसणाचे बारीक तुकडे - २ पाकळ्या बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ कोथिंबीर ओवा - १ चमचा हिंग  हळद - अर्धा चमचा बेसन - १/४ कप मीठ तेल 

कृती 

1. सगळ्यात आधी कणीस सोलून घ्या, त्यानंतर त्याचे तुकडे करुन किसून घ्या. लक्षात ठेवा कणीस हा कोवळा असायला हवा. ज्यामुळे तो लवकर किसला जाईल. 

2. एका बाऊलमध्ये किसलेला मका, आले, लसूण आणि मिरची घाला. वरुन कोथिंबीर, ओवा, हिंग, हळद पावडर घाला.

3. मीठ घालून मिश्रण एकजीव करा. बेसनाचे पीठ घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करा.

4. पॅन गरम करुन त्यावर तेल पसरवा. नंतर तयार सारण व्यवस्थित पसरवून घ्या. वरुन तेल घालून दोन्ही बाजूने शेका.

5. कोथिंबीरीची चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर, टोमॅटो, लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. वरुन मीठ घाला. 

6. गरमागरम कॉर्न चिलासोबत कोथिंबीरची चटणी खा. 

 

टॅग्स :अन्नपाककृती